अभिनंदन… सीबीएसई परीक्षेत आर्या चौधरी तालुक्यातून अव्वल
जितेंद्र कोठारी, वणी : केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्ड ( CBSE) इयत्ता 10 वीच्या बोर्ड परीक्षेचा निकाल शुक्रवार 12 मे रोजी जाहीर करण्यात आला. या परीक्षेत अल्फ्रोस स्वर्णलीला इंटरनॅशनल स्कूलची विद्यार्थिनी कु. आर्या मनीष चौधरी हिने 98.50 टक्का गुण मिळवून वणी उपविभागात प्रथम तर यवतमाळ जिल्ह्यातून दुसरा क्रमांक पटकावला आहे. तिला 600 पैकी 591 मार्क मिळाले.
कु. आर्या चौधरी ही वणी येथील प्रख्यात आर्किटेक्ट मनीष चौधरी यांची कन्या व ऍड. निलेश चौधरी यांची पुतणी आहे. आर्या चौधरी हिला हिंदी, गणित आणि आय. टी. या विषयात 100 पैकी 100 गुण मिळाले. तर इंग्रजी विषयात 97, साईंस मध्ये 97 व सोशल साईंस या विषयात तिला 99 गुण मिळाले. आर्या चौधरी हिच्या यशाबद्दल सर्वस्तरावरून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
कु. आर्या हिने आपल्या यशाचे श्रेय आपले आई-वडील, शाळेचे संचालक नरेंद्र रेड्डी सर, मुख्याध्यापिका सोजन्या मॅम, सर्व शिक्षक आणी शिक्षकेत्तर कर्मचारी आणि लोया सर यांना दिला आहे.
Comments are closed.