प्रेयसीचे वारंवार शोषण, फसवणूक करणारा प्रियकर गजाआड

विवेक तोटेवार, वणी: लग्नाचे आमिष दाखवून एका प्रियकराने प्रेयसीचे वारंवार शोषण केले. विशेष म्हणजे या संबंधातून प्रेयसी ही गर्भवती देखील झाली होती. मात्र गर्भपात करून प्रियकर प्रेयसीला विविध ठिकाणी नेऊन शोषण करायचा. अखेर फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पीडित तरुणीने वणी पोलीस स्टेशन गाठत याबाबत तक्रार दाखल केली. आरोपीवर बलात्कारासह ऍट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आज सकाळीच आरोपीला पोलिसांनी गजाआड केले.

Podar School 2025

सविस्तर वृत्त असे की, आरोपी कसीब मोबिन रहेमान (25) हा वणीतील रंगनाथ नगर येथील रहिवासी आहे. तर पीडित तरुणी (25) ही गावातीलच रहिवासी आहे. त्या दोघांची 2017 साली ओळख झाली. पुढे ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले. प्रियकर प्रेयसीच्या घरी जायचा. तिथे तो शरीर संबंधासाठी जबरदस्ती करायचा. मात्र प्रेयसी नकार द्यायची.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

पुढे प्रियकर कसीबने पीडितेला लग्नाचे दाखवले व तिच्याशी शरीरसंबंध प्रस्तापीत केले. कधी पीडितेच्या घरी, कधी, काजूवन, लालगुडा तर कधी शहरातीलच लॉजमध्ये नेऊन तो तिच्याशी शरीरसंबंध ठेवायचा. दरम्यान 2022 मध्ये प्रेयसी गर्भवती राहली. आरोपीने तिचा गर्भपात केला व तिच्याशी पुन्हा शारीरिक संबंध ठेवले.

पीडितेचे प्रियकराला अनेकदा लग्नाबाबत विचारणा केली. आधी तर तो लग्नासाठी हो म्हणायचा. मात्र नंतर त्याने टाळाटाळ करण्यास सुरवात केली. अखेर फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पीडितेने वणी पोलीस स्टेशन गाठत याबाबत तक्रार दाखल केली. तक्रारीवरून वणी पोलिसात कलम 376 (2) (N), 312, 417, 506 भांदवि व ऍट्रोसिटीच्या 3 (1) (W) (I) 3 (2) (5a) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

आज शुक्रवारी दिनांक 24 मार्च रोजी सकाळी वणी पोलिसांनी आरोपीला अटक केली. घटनेचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पुज्जलवार करीत आहे.

Comments are closed.