प्रेमनगर येथे पोलिसांची ‘रेड’, तीन महिला ताब्यात

जितेंद्र कोठारी, वणी: जत्रा मैदान परिसरा लगत असलेल्या प्रेमनगर येथे पोलीस पथकाने धाड टाकत तीन महिलांना ताब्यात घेतले. या महिला वेश्या व्यवसायाच्या उद्देशाने रस्त्यातील इसमांना हातवारे करताना आढळल्या. यातील एक महिला महाराष्ट्र तर इतर दोन महिला या परराज्यातील आहे. गुरुवारी दुपारी ही कारवाई करण्यात आली. वेश्या व्यवसाय करणा-या महिलांवर एका महिन्यातील ही दुसरी कारवाई आहे.

सविस्तर वृत्त असे की शहरीतील जत्रा मैदान नजीक प्रेमनगर हा परिसर आहे. ही वस्ती वारांगणा वस्ती म्हणूनही ओळखली जाते. गुरुवारी दिनांक 16 मार्च रोजी दुपारी 4 वाजताच्या सुमारास पोलिसांचे पथक प्रेमनगर परिसरात गेले असता त्यांना तिथे 3 महिला या रस्त्यावर येऊन येणा-या जाणा-या इसमांना अश्लिल हातवारे करून बोलावताना आढळले. त्यामुळे पथकातील महिला कर्मचा-यांनी या तीन मुलींना ताब्यात घेऊन विचारणा केली असता त्या वेश्या व्यवसायाच्या उद्देशाने इसमांना बोलावत असल्याचे आढळून आले.

पोलिसांनी या प्रकरणी तीन महिलांना अटक केली असून यातील एक महिला ही मुळची मराठवाडा येथील रहिवासी असून दुसरी मध्यप्रदेश तर तिसरी राजस्थान येथील आहे. पथकाने घटनेचा पंचनामा करून तिन्ही महिलांविरोधात अनैतिक व्यापार प्रतिबंधच्या कलम 7 व 8 नुसार गुन्हा दाखल केला आहे. सदर कारवाई ठाणेदार प्रदीप शिरस्कर, सुदर्शन वानोळे, सुहास मंदावार, रुपाली बदखल, प्रगती काकडे इत्यादींनी केली.

वणीतील सेक्स रॅकेटचा होणार पर्दाफाश? 
अलिकडेच पो.नि. प्रदीप शिरस्कर यांनी ठाणेदार पदाचा पदभार स्वीकारला आहे. पदभार स्वीकारताच त्यांनी अनैतिक व्यापाराविरोधात दंड थोपटले आहे. एकाच महिन्यात पोलिसांनी प्रेमनगर येथे दोनदा कारवाई केली आहे. वणी शहरातील नागरी वस्तीतही मोठ्या प्रमाणात सेक्स रॅकेट सुरू आहे. रूम, ब्लॉक, फ्लॅट भाड्याने घेऊन तिथे देहविक्री व्यवसाय चालतो. काहींनी तर घरीच सेवा सुरू केली आहे. या व्यवसायात मोठ्या प्रमाणात वणीतील तसेच ग्रामीण भागातील तरुणी व महिला अडकलेल्या आहे. सोबतच काही दलाल देखील या व्यवसायात सक्रीय आहे. ग्राहकांची डिमांड लक्षात घेऊन अनेकदा बाहेरगावाहूनही मुली ही सेवा देण्यास बोलावल्या जातात. असे सेक्स रॅकेट चालवणा-यांवरही कारवाई होणे गरजेचे आहे. या सेक्स रॅकेटबाबत ‘वणी बहुगुणी’ने 10 भागांची सविस्तर वृत्त मालिकाही चालवली होती.

हे देखील वाचा: 

शेतातील बंड्याला आग लागून लाखोंचे नुकसान, महाकालपूर शिवारातील घटना

शौचास जाण्याचे कारण सांगून गेलेली अल्पवयीन मुलगी बेपत्ता

Comments are closed.