वागदरा येथे कोंबडबाजारावर पोलिसांची धाड

10 शौकिनांना अटक, 5 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

0

विवेक तोटेवार, वणी: रविवार 14 मार्च रोजी सकाळी 11 वाजताच्या सुमारास तालुक्यातील जुना वागदरा येथे कोंबडबाजारावर धाड मारून 10 जनांसह 4 लाख 79 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

Podar School 2025

सविस्तर वृत्त असे की, रविवार सकाळी वणी पोलिसांना माहिती मिळाली की तालुक्यातील जुना वागदरा येथे काही जण कोंबड्याच्या झुंजीवर पैसे लावून जुगार खेळत आहे. त्यानुसार वणी पोलिसांनी सापळा रचला व सकाळी 11 वाजताच्या सुमारास जुना वागदरा येथे धाड टाकली.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

धाड टाकताच सदर ठिकाणी एकच खळबळ उडाली. अनेकांनी या ठिकाणाहून आपल्या मोटारसायकल तेथेच ठेऊन पळ काढला. पोलिसांनी या ठिकाणाहून संपूर्ण मुद्देमाल जप्त केला. यामध्ये 5 कोंबडे, लोखंडी काती, 7 मोटारसायकल किंमत 3 लाख 20 हजार जप्त केल्या. पोलिसांनी तात्काळ आरोपींचा शोध घेऊन 10 आरोपींना अटक केली.

राजू पांडुरंग चव्हाण (33), संदीप नामदेव इचवे, शेख अशपाक मोहमद शफी (36), मनीष रामचंद्र वैद्य (42), अमोल गोविंदा कळसकर (28), महादेव कवडुजी उपरे (24), विशाल संतोष बोकडे (19), मनोज रामचंद्र वैद्य (38), सुरज उद्धव खामनकर (29), सैफाज मोहमद अली (22) यांना अटक करून त्यांच्यापासून 42300 रुपये, 8 मोबाईल किंमत 1 लाख 15 हजार, असा एकूण 4 लाख 79 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपींवर महाराष्ट्र जुगार कायद्याच्या कलम 12 (ब) 12 (क),  भादंविच्या कलम 269, 270, 188 व साथीचे रोग अधिनियम 1897 नुसार कलम 2 व 3 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

धाडीसाठी अशी रचली व्यहरचना
दरवेळी कोंबडबाजाराच्या ठिकाणी धाड मारण्याची माहिती आधीच मिळते. त्यामुळे धाड यशस्वी होत नाही. त्यामुळे पोलिसांनी यावेळी जबरदस्त नियोजन केले. सकाळी 8 ते 9 वाजताच्या दरम्यान पोलिसांचे पथक नांदेपेरा रोडवरील एका लेआउटमध्ये त्यांच्या दुचाकीने गोळा झालेत. खासगी ऍटोही बोलावण्यात आले. तिथे त्यांनी त्यांच्या दुचाकी ठेवल्या व दोन ऍटोने सर्व पथक बायपासमार्गे घटनास्थळाकडे रवाना झालेत. दरम्यान बायपास मार्गाने कुणालाही थांगपत्ता न लागू देता निघाल्याने कोंबडबाजार चालकांना खब-यांकडून याची माहिती मिळाली नाही व धाड यशस्वी झाली.

सदर कारवाई डॉ दिलीप पाटील भुजबळ पोलीस अधीक्षक, खंडेराव धरणे अप्पर पोलीस अधीक्षक, संजय पुजलवार उपविभागीय पोलीस अधिकारी, वैभव जाधव ठाणेदार वणी यांच्या मार्गदर्शनाखाली पोउनि शिवाजी टिपूर्णे, पोऊनी प्रताप बाजड, डीबी प्रमुख पोउनि गोपाल जाधव, सुधीर पांडे, सुनील खंडागळे, रत्नपाल मोहाडे, पंकज उंबरकर, सुदर्शन वनोळे, दीपक वांड्रसवार, इमरान खान, सुनील केळकर, मिथुन राऊत, यांनी केली घटनेचा तपास सपोनि संदीप एकाडे करीत आहे.

हे देखील वाचा:

Leave A Reply

Your email address will not be published.