जब दीप जले आना’ ऑनलाईन मैफल रंगली

कलोतीनगर, अमरावती येथील सिंफनी स्टुडिओचे आयोजन

0
Jadhao Clinic

बहुगुणी डेस्क, अमरावतीः ‘जब दीप जले आना’ या शीर्षकाखाली ऑनलाईन संगीत मैफल रंगली. स्थानिक कलोतीनगर येथील सिंफनी ट्यून्स स्टुडिओने या मैफलीचे आयोजन केले होते. यात निवडक गीतांचे सादरीकरण स्थानिक कलावंतांनी केले.

‘कभी किसी को मुकम्मल जहां नही मिलता’ या गीताने मैफलीचा आरंभ झाला. पल्लवी राऊत यांनी हे गाणं प्रस्तुत केलं. या गाण्याबरोबरच मैफलीची दमदार सुरुवात झाली. गुरूमूर्ती चावली यांनी आपल्या सुरेल आवाजात ‘एक अंधेरा लाख सितारे’ हे गीत पेश केलं.

गुरुमूर्ती चावली यांच्या या गाण्याने समा बांधला. ‘तुम बिन जिया जाए कैसे’ हे गीत डॉ. नयना दापूरकर यांनी गायलं. डॉ. नयना यांनी या गीताला पुरेपूर न्याय देत रसिकांची मने जिंकलीत. ‘समय ओ धिरे चलो’ अरविंद व्यास यांनी गायलेल्या या गीताने मैफलीत रंग भरला.

‘सुहानी चांदनी राते’ हे गीत गुरूमूर्ती चावली यांनी गात मैफल जिंकली. ‘तुझ से नाराज नही जिंदगी’ हे गीत पल्लवी राऊत यांनी पेश केलं. राऊत यांच्या या गीतातून जणू जीवनाशी संवादच साधला गेला. ‘जब दीप जले आना’ हे शीर्षक गीत डॉ. गुणवंत डहाणे यांनी प्रस्तुत केलं.

या शीर्षकगीताने एक वेगळीच उंची गाठली. गुरूमूर्ती चावली यांनी गायलेल्या ‘सागर से गहरा है प्यार’ या गीताने मैफलीची सांगता झाली. गुरुमूर्ती चावली यांच्या अजोड आवाजाने गाण्याला एक वेगळी झळाळी मिळाली.

या मैफलीचं अभ्यासपूर्ण आणि बहारदार निवेदन नासीर खान यांनी केलं. सचिन गुडे यांनी पियानोची तर विशाल पांडे यांनी तबल्याची साथ केली. संगीत संयोजन सुनीत बोरकर यांचं होतं. कार्यक्रमाचं कलात्मक चित्रिकरण अमीन गुडे यांनी केलं. भूषण बारबुद्धे यांचं तांत्रिक सहाय्य लाभलं.

सिंफनी ट्यून्स स्टुडिओच्या ‘सिंफनी ट्यून्स’ या यूट्यूब चॅनलवर हा लाईव्ह कार्यक्रम झाला. संगीत रसिकांना तो बघण्यासाठी यूट्यूबवर उपलब्ध करून दिलेला आहे. सिंफनी स्टुडिओत याचं चित्रिकरण आणि रेकॉडिंग झालं.

खालील लिंकवर कार्यक्रम कधीही पाहता येईल

https://youtu.be/HBNA8j0ghck

 

हेदेखील वाचा

छोरीया ले आऊटमधील फ्लॅटमध्ये भीषण आग

हेदेखील वाचा

ग्रामीण पत्रकार संघाने वाचविले मुक्या जनावराचे प्राण

हेदेखील वाचा

ग्रामीण भागातही ओसरतोय कोरोना, आज तालुक्यात 7 रुग्ण

Comments
Loading...
error: कॉपी करू नका, बातमी आवडल्यास शेअर करा !!