आज वणी तालुक्यात 9 पॉजिटिव्ह

कोरोनामुक्त 26 व्यक्तींना आज सुटी

0

जब्बार चीनी, वणी: तालुक्यात मंगळवारी दिनांक 2 जून रोजी तालुक्यात कोरोनाचे 9 रुग्ण आढळले. यात श्रीकृष्णभुवन परिसर 1, वासेकर लेआऊट 1, मनीषनगर 1 असे वणी शहरातील रुग्ण आहेत. तर चिखलगाव 2, पुनवट (वणी)2, गणेशपूर 1, उमरी (वणी) 1 असे ग्रामीण भागातील रुग्ण आहेत.

आज 26 कोरोनामुक्त व्यक्तींना सुटी देण्यात आली. सध्या तालुक्यात 72 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. तालुक्याची कोरोनामुक्ती झपाट्याने वाटचाल सुरू आहे. वणीतील रुग्णसंख्येचे प्रमाण खूपच कमी झाले आहे तर ग्रामीण भागात काही प्रमाणात रुग्ण आहेत.

आज यवतमाळ येथून 147 रिपोर्ट आले, यात 7 व्यक्ती पॉझिटिव्ह आल्यात. तर आज 116 संशयीतांची रॅपिट ऍन्टीजन टेस्ट करण्यात आली. यात 2 व्यक्ती पॉझिटिव्ह आलेत. आज आलेल्या रुग्णावरून 39 संशयीतांचे स्वॅब यवतमाळ येथे तपासणीसाठी पाठवण्यात आले. अद्याप यवतमाळहून 39 संशयीतांचे रिपोर्ट येणे बाकी आहे.

सध्या तालुक्यात कोरोनाचे 72 ऍक्टिव्ह रुग्ण (शासकीय लॅबच्या आकड्यानुसार) आहेत. यातील 12 रुग्ण कोविड केअर सेंटरला उपचार घेत आहेत. तर 46 रुग्ण होम आयसोलेट आहेत. 14 रुग्णांवर यवतमाळ व इतर ठिकाणी उपचार सुरू आहे. तालुक्यात कोरोनाचे एकूण 5236 रुग्ण आढळून आलेत. यातील 5071 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर आतापर्यंत 93 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. (यात बाहेरगावी उपचार सुरू असताना मृत झालेल्या रुग्णांचा समावेश नाही.)

हे देखील वाचा:

धक्कादायक: जिवंत असलेला शेतकरी शासन दरबारी मयत

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

हे देखील वाचा:

अखेर शटर वरती… दुकाने सजली, बाजारपेठ फुलली

हे देखील वाचा:

 

आज केवळ 1 पॉझिटिव्ह तर 19 रुग्णांनी केली कोरोनावर मात

Leave A Reply

Your email address will not be published.