आरोग्यधाम हॉस्पीटलमध्ये “महात्मा फुले जन आरोग्य योजना” सुरु

गरजुंना महागडे आणि खर्चीक उपचार मिळणार मोफत

0

दिग्रस: दिग्रस येथील संत श्री रामराव महाराज आरोग्यधाम हॉस्पिटलमध्ये राज्य शासनाची ”महात्मा फुले जन आरोग्य योजना” सुरु झाली आहे. या योजनेअंतर्गत पिवळे तसेच केशरी शिधापत्रिका धारक कुटुंबाला वार्षिक दिड लाख रुपयांपर्यंतचे उपचार मोफत दिले जाणार आहे. यात ७२१ प्रकारच्या आजारांचा समावेश असून यामध्ये डायलिसीस, मेंदुविकार, हृदयरोग, हाडांचे आजार, किडनीचे आजार, कान-नाक-घशाचे आजार, महागड्या शस्त्रक्रिया यांचा समावेश आहेत. तसेच यात रुग्णांना मोफत औषधीही दिली जाणार आहे.

गंभीर आजार किंवा शस्रक्रीयेसाठी रुग्णांना उपचारासाठी मुंबई, पुणे, औरंगाबाद, नागपूर इत्यादी ठिकाणी जावे लागते. यात रुग्णांना मोठा खर्च ही करावा लागतो. गरीब रुग्णांना हा खर्च परवडणारा नाही. त्यामुळे गरीब, गरजू व आर्थिक दृष्टया दुर्बल रुग्णांना योग्य तो उपचार मोफत मिळावा यासाठी दिग्रस येथील संत श्री डॉ. रामराव महाराज आरोग्यधाम हॉस्पीटलमध्ये महाराष्ट्र शासनाची “महात्मा फुले जन आरोग्य योजना” (पूर्वीची राजीव गांधी जीवनदायी योजना) हि लोकाभिमुख योजना सुरु करण्यात आली आहे.

राज्य शासनाद्वारे संचालित या योजनेअंतर्गत अनेक महागड्या, खर्चिक व फक्त मोठ्या शहरात उपलब्ध असणारे उपचार, तपासण्या व शस्त्रक्रियांचा समावेश आहे. गरीब व दुर्बल घटकातील गरजु रुग्णांना या योजनेचा लाभ मिळावा यासाठी गेल्या काही दिवसांपासून आरोग्यधाम हॉस्पिटलचे संचालक मंडळ प्रयत्नशील होते. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाले आणि ही योजना आरोग्यधाम हॉस्पिटलमध्ये सुरू झाली.

योजनेबाबत माहिती देताना आरोग्यधाम हॉस्पिटलचे संचालक डॉ. शाम जाधव म्हणाले की…

आपल्या भागात मोठ्या प्रमाणात गरीबी आणि दारिद्र्य आहे. पैशाअभावी अनेक गंभीर आजारावर रुग्णांना योग्य तो उपचार मिळत नाही. मात्र आरोग्यधाम हॉस्पिटलमध्ये “महात्मा फुले जन आरोग्य योजना” सुरू झाल्याने रुग्णांना याचा मोठा लाभ होणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी हॉस्पिटलमध्ये आरोग्य मित्र हे काउंटर सुरु करण्यात आले आहे. या ठिकाणी योजने अंतर्गत समाविष्ट असणारे रोग, उपचार, तसेच यासाठी लागणा-या कागदपत्रांची माहिती दिली जाते. तसेच या योजनेचा लाभ कसा घेता येईल याचे मार्गदर्शनही करण्यात येत आहे. अशी माहितीही डॉ. शाम जाधव यांनी दिली.

आरोग्यधाम हॉस्पीटल येथे २४ तास कार्यरत तज्ज्ञ डॉक्टर्स, २४ तास रुग्णवाहिका, अपघात विभाग , अतिदक्षता विभाग (ICU), स्त्रीरोग व प्रसूती विभाग यासह हृदयरोग विभाग, जनरल सर्जरी विभाग, अस्थिरोग विभाग, बालरोग विभाग, कान-नाक-घसा विभाग, नेत्र रोग विभाग, दंत रोग विभाग आयुर्वेद, पंचकर्म व क्षारसूत्र विभाग, कँसर विभाग, त्वचारोग विभाग, मानसिक रोग विभाग आहेत. यासह सीटी स्कॅन, कलर डॉप्लर, सोनोग्राफी, डिजीटल एक्स रे, २४ तास रक्तपेढी, २४ तास पॅथॉलॉजी , २४ तास औषधी सेवा उपलब्ध आहेत. तसेच रुग्णांसाठी कॅशलेस विमा सुविधाही उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

या योजनेचा गरजू रुग्णांनी लाभ घ्यावा तसेच योजनेची माहिती गरजुंपर्यंत पोहोचवावी असे आवाहन आरोग्यधाम हॉस्पिटलचे संचालक डॉ. प्रशांत रोकडे, डॉ. श्याम जाधव, डॉ. संदीप दुधे, डॉ. आशिष शेजपाल व डॉ. श्रीकृष्ण पाटील यांनी केले आहे. रुग्णांना कोणत्याही प्रकारची मदत लागल्यास किंवा अडचण आल्यास ९४२२९२२८६३, ९०२१०१४५१८ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहनही करण्यात आले आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.