गरजू रुग्णांवर होणार शासकीय योजनेतून उपचार: डॉ. जाधवया रोगाबद्दल अनेक नकारार्थी गोष्टी लोकांमध्ये आहेत. यात मुख्यतः कॅन्सर हा रोग शहरवाल्यांचा, श्रीमंतांचा आहे अशी चुकीची धारणा लोकांमध्ये आहे. मात्र असं काहीही नाही. हा रोग कुणालाही होऊ शकतो. फक्त गावखेड्यातील माणूस दवाखान्यात उपचारासाठी पोहोचत नसल्याने त्याचे निदान होत नाही. ग्रामीण भागातील लोकांमध्ये कॅन्सरचे निदान होऊन त्यांना योग्य तो उपचार मिळावा यासाठी या शिबिराचे आयोजन कऱण्यात आल्याचे डॉ. श्याम जाधव (नाईक) यांनी सांगितले. ज्या रुग्णांमध्ये कॅन्सरचे निदान झाले आहे अशा रुग्णांवर शासकीय योजनेद्वारे सर्व उपचार केला जाईल अशी माहितीही त्यांनी दिली.
