लागला उन्हाळा… तब्येती सांभाळा…

0 896

बहुगुणी डेस्क: उन्हाळा लागल्याच्या कल्पनेनेच घाम येतो. उन्हाळ्यासोबतच येतात अनेक आजार. थोडी काळजी घेतली तर आपण या उन्हाळ्यातदेखील आनंद घेऊ शकतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उन्हाळ्यात पाण्याचा वापर वाढवावा. श्यक्यतो माठातलेच पाणी प्यावे. उन्हात बाहेर पडताना आठवणीने डोके झाकून घ्यावे. उत्तम दर्जाचा गॉगल वापरावा. घाम शोषून घेतील असे सैल व हलक्या रंगांचे सुती कपडे वापरावेत.

जमल्यास दोन वेळा आंघोळ करावी. ग्लुकोज किंवा इलेक्ट्रॉल पावडर व पाणी सदैव जवळ बाळगावे. उष्ण वातावरणामुळे अन्न लवकर आंबतं, नासतं व खराब होतं. त्यामुळे अन्न सेवन करताना पुरेशी काळजी घ्यावी. एसीतून उन्हात व उन्हातून एसीत डायरेक्ट जाऊ नये. चहाचे प्रमाण कमी करून कोकम, लिंबू, पन्हे, सरबत, ताक, नारळपाणी व कलिंगड, खरबूजासारख्या फळांचं सेवन वाढवावं. रोज एक चमचा गुलकंदाचं सेवन करावं. रात्री झोपताना तळपायांना अभ्यंग करावं. जंकफूड ऐवजी पोषक आहार करावा. आरोग्याबाबत काही तक्रार जाणवल्यात आपल्या डॉक्टर्सशी संपर्क साधून योग्य औषधोपचार करावेत. उन्हाळ्याच्या शुभेच्छा……

Comments
Loading...