भारताचे पाकिस्तान-चिनसोबत युद्ध झालेच तर… एवढा मोठा आर्थिक भुर्दंड !

13व्या युनिफाईड कमांडर्स कॉन्फरन्समध्ये सैन्यांची पुढील पाच वर्षांची योजना सादर

0

नवी दिल्ली: सीमेवर वाढलेला ताणतणाव लक्षात घेता, युद्धजन्य परिस्थिती कधीही निर्माण होवू शकते. त्यामुळे भविष्यात होवू शकणाऱ्या युद्धासाठी भारताला तयार रहावे लागणार आहे. त्यासाठी भारताला सैन्याच्या आधुनिकीकरणावर भर द्यावा लागणार आहे. आधुनिकीकरणासाठी पुढील पाच (२०१७-२०२२) वर्षात भारताला २६.८४ लाख कोटी रुपयांची गरज भासणार आहे.

टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, १३ व्या युनिफाईड कमांडर्स कॉन्फरन्समध्ये सैन्यांची पुढील पाच वर्षांची योजना सादर करण्यात आली. यामध्ये सैन्याला पुढील ५ वर्षांमध्ये २६ लाख ८३ हजार, ९२४ कोटी रुपयांची आवश्यकता असल्याचे नमूद केले आहे.

या कॉन्फरन्समधील सूचना लवकरात लवकर मान्य करा, अशी मागणी सुरक्षा दलांकडून करण्यात आली आहे. संरक्षण विभागासाठी अधिक रक्कमेची तरतूद करण्याची मागणीही करण्यात आली आहे. पाकिस्तानकडून वारंवार होणारे शस्त्रसंधीचे उल्लंधन आणि चीनसोबत सुरू असलेला नवा वाद. या पार्श्वभूमीवर आधुनिकीकरणाची मागणी सैन्याकडून करण्यात आली आहे. यासाठी येत्या पाच वर्षात जवळपास २७ लाख कोटींचा खर्च अपेक्षित आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.