प्रशांत कांबळे, मुंबई: सत्ताधारी पक्षाकडून नियम 293 अन्वये उपस्थित कर्जमाफीच्या प्रस्तावावरील चर्चेत सहभागी होताना कडू बोलत होते.
कडू म्हणाले, ” सर्व राजकीय पक्ष शेतकऱ्यांचे मारेकरी आहेत. दहा हजारापेक्षा जास्त भाव असलेली तूर यंदा हजार रुपयांनी खरेदी केली. शेतकऱ्यांची एकही अडीज लाखाचे नुकसान झाले. शेतकरी कर भरत नाही असे आरोप शहरी लोक करतात. मग टॅक्टरसाठी डिझेल- पेट्रोल आणि वस्तुंच्या खरेदीवर कोण कर भरत ते सांगा ? तुरीची आयात करुन त्यावर स्टॉक लिमीट लावायचं म्हणजे छातीवर हत्ती ठेऊन पळ म्हणण्यासारखे आहे. स्वामिनाथन समितीच्या अहवालाची अंमलबजावणी करा, शेतमाला भाव द्या, पाच लाखाचे पीक कर्ज असताना साडेतीन लाख भर म्हणायचं आणि दीड लाख देऊ असे सांगणारे सरकार म्हणजे बॅंकेचे एजंट आहे का ? ”
2016-17 वर्षाच्या पीक कर्जाचा कर्जमाफीत समावेश करा, पुर्नगठीत कर्जाचा समावेश थकीत कर्जात करा, पॉलीहाऊसच्या शेतीच्या कर्जाचा कर्जमाफीत समावेश करा, परीपुर्ण कर्जमाफीची अंमलबजावणी झाली नाही, तर येत्या 14 ऑगस्टपासून चक्का जाम करुन 15 ऑगस्ट रोजी मंत्र्यांना झेंडावंदन करून देणार नाही असा इशारा कडू यांनी दिला.