Browsing Tag

Mukutban

मुकुटबन पोलिसांची कोंबड़ बाजारावर धाड,

सुशील ओझा,झरी: मुकुटबन पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या घोंसा येथील अमराई परिसरात कोंबडबाजार सुरू असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. यावरून पोलिसांनी सापळा रचला व 1 नोव्हेंबरला सकाळी 10 वाजता दरम्यान सुरू असलेल्या कोंबड बाजारावर धाड…

मुकुटबनला मिळाला नवीन कोंडवाडा

सुशील ओझा, झरी: मुकुटबन येथील कोंडवाड्याचा उद्घाटन सोहळा पार पडला. वणी विधानसभा क्षेत्राचे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडला. मुकुटबन येथील जनावरांचा कोंडवाडा गेल्या एक वर्षांपासून अडगळीत होता. आतील…

मुकुटबनमध्ये धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा

सुशील ओझा, झरी: हजारो वर्षाच्या गुलामगिरीतून मुक्तता मिळवून आपल्या असंख्य अनुयायांना सोबत घेऊन 14 ऑक्टोबर 1956 म्हणजेच अशोक विजयादशमीला नागपूर मध्ये बाबासाहेबांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली, हा दिवस धम्मचक्र प्रवर्तन दिन म्हणून दरवर्षी…

अथर्व मुंडेचे NEET परीक्षेत घवघवीत यश

सुशील ओझा, झरी: नुकतेच पार पडलेल्या नीट परीक्षेत मुकुटबन येथील अथर्व सिद्राम मुंडे याने 720 पैकी 621 गुण मिळवून घवघवीत यश प्राप्त केले आहे. अथर्व हा मुकूटबन येथील गजानन महाराज महाविद्यालयातील प्राध्यापक सिद्राम मुंडे यांचा मुलगा आहे. अथर्व…

पती नव्हता घरात, म्हणून त्याने केला घात

सुशील ओझा,झरी:- मुकुटबन पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या गणेशपूर येथील आजारी महिलेच्या घरात घुसून विनयभंग केल्याची घटना घडली. पीडित महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा निवड करून आरोपीस अटक करण्यात आली. पीडितेचा पती घरात नसल्याचे पाहून…

आर्या इंटरनॅशनल व गुरुकुल कॉन्व्हेंटच्या विद्यार्थ्यांचे सुयश

सुशील ओझा, झरी: महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदे अंतर्गत फेब्रुवारी 2020 मध्ये घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक परीक्षा 5 वी व पूर्व माध्यमिक परीक्षा इयत्ता 8 वी तील आर्या इंटरनॅशनल स्कूलच्या 8 विद्यार्थ्यांनी तर गुरुकुल कॉन्व्हेंटच्या 5…

लिंगारेड्डी लेआऊटमधील अतिक्रमण उठवण्याचा मार्ग मोकळा

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील मुकुटबन येथील वणी ते मुकुटबन मुख्य मार्गावरील लिंगारेड्डी लेआऊट मधील प्लॉटधारकाने ग्रामपंचायतीच्या जागेवर अतिक्रमण केल्याची तक्रार करण्यात आली होती. अतिक्रमण केलेल्या शौचालयाचे पाणी व दुकानातील पाणी घरात शिरत…

त्याने केलं शुटिंग अन् मागे लागलं धतिंग

सुशील ओझा, झरी: दारूच्या अवैध विक्रीचं त्याने शुटिंग केलं. सोशल मीडियावरून ते व्हायरल झालं. सोबतच त्याच्यामागे धटिंग लागलं. त्याला त्या कारणासाठी मारहाण झाली. मुकुटबन येथील युवकास मार खावा लागला. पोलीस तक्रारीची वाट पाहत, मूग गिळून गप्प…

जयंती होती गांधींची, त्याने वाट पाहिली संधीची

सुशील ओझा, झरी: गांधीजयंतीची वाटच जणू तो पाहत होता. 'ड्राय डे'मुळे दारू बेभाव विकण्याचा त्याचा बेत होता. मात्र पोलिसांच्या सतर्कतेने त्याची ही 'संधी' हुकली. हातात बेड्या पडल्यात. मुकुटबन पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या घोंसा येथे दारूची अवैध…

मुकुटबन येथील जिनिग व प्रेसिंगच्या निविदा काढण्यात याव्यात

सुशील ओझा, झरी: कापूस हंगाम सन २०२०-२१ मधील कापूस खरेदीकरिता तालुक्यातील मुकुटबन येथील जिनिग व प्रेसिंगच्या निविदा काढाण्याची मागणी करण्यात आली. शेतकरी तथा युवक कॉंग्रेसने तसे निवेदन केंद्रियमंत्र्यांना दिले. तालुक्यातील सर्वात मोठी…