फ्रँकफर्ट: जर्मनीतील वाहन निर्माती कंपनी ऑडी जगभरातून ८.५ लाख कार परत मागवणार आहे. अमेरिका व कॅनडा वगळता जगभरातील ६ व ८ सिलिंडर डिझेल कारचा यामध्ये समावेश आहे. ऑडीने या उत्सर्जनात सुधारणा करण्यासाठी कार परत मागवण्याचा निर्णय घेतला आहे.
एका उत्सर्जन घोटाळ्यात नाव आल्यानंतर ऑडीने इयू ५ आणि इयू ६ डिझेल इंजिन कारच्या आपल्या ग्राहकांसाठी एक कार्यक्रम सुरू केला आहे. या प्रकारच्या इंजिन असणार्या पोर्शे आणि फॉक्सवॅगन कारला या कार्यक्रमांतर्गत मोफत सुविधा मिळणार आहे, असे कंपनीने सांगितले आहे.
ऑडीने शुक्रवारी जर्मनीच्या फेडरल मोटर ट्रान्सपोर्ट अथॉरिटीकडून सल्ला घेऊन गाड्या मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनी डिझेल वाहनांमध्ये उत्सर्जनाबाबतच्या सुधारणांशिवाय भविष्यात गुणवत्ता कायम ठेवण्यासाठी प्रयत्नशील आहे. या कार्यक्रमामध्ये कंपनी शहरी भागाकडे जास्त लक्ष देत आहे.
( डुकाटीची 60 लाखांची धडाकेबाज बाईक भारतात लॉन्च )
यापूर्वीच मंगळवारी दुसरी एक जर्मन कंपनी ‘एजी’ने उत्सर्जन समस्यसाठीच कार परत घेण्याचा निर्णय घेतला आहे. एजीने संपूर्ण युरोपमधून मर्सिडीज बेंज प्रकारातील ३० लाख गाड्या माघारी घेण्याची घोषणा केली आहे. डिझेल कारच्या या कायक्रमासाठी कंपनीला २२ कोटी युरो खर्चावे लागणार आहेत.