बजाजने लॉन्च केल्या जबरदस्त मायलेज देणा-या दोन नवीन बाईक
सर्वात जास्त मायलेजचा दावा, जाणून घ्या बाईकची किंमत आणि किती देणार मायलेज ?
नवी दिल्ली: पेट्रोलच्या सारख्या वाढणा-या भावामुळे सर्वच त्रस्त झाले आहेत. त्यामुळे आता अनेकांची अधिक मायलेज देणा-या बाईकला पसंती असते. लोकांची हिच मागणी लक्षात घेऊन बजाज ऑटोने आपल्या दोन बाईक्स अपडेट करुन रिलॉन्च केल्या आहेत. बजाजने प्लॅटिना ES स्पोक आणि CT 100 ES अलॉय या दोन बाईक्स रिलॉन्च केल्या आहेत. या दोन्ही बाईक्स आता नव्या रुपात आल्या आहेत. यात अनेक नवीन फिचर्सही आहेत.
काय आहेत नवीन बाईकमधले फिचर्स ?
बजाज CT 100
बजाजची CT 100 ही बजेटमधील बाईक आहे. इलेक्ट्रिक स्टार्ट आणि अलॉय व्हिक असलेल्या या बाईकची एक्स शो रूममधील किंमत 41,997 रुपये आहे. या गाडीचा लूक एकदम सिंपल आहे. मात्र, परफॉरमंस आणि मायलेज या गाडीची खास बाब आहे. या गाडीचा मायलेज अधिक आहे तर कमी किंमत हे या गाडीचे दोन प्लस पॉईंट आहेत. यामध्ये 100cc चं इंजिन लावण्यात आलेलं आहे जे 8.2ps ची पॉवर आणि 8.05nm चं टार्क देतं.
बजाज प्लॅटीना ES अलॉय व्हीक
बजाज प्लॅटीना ES अलॉय व्हीक या गाडीची दिल्लीतील एक्स शो रूममधील किंमत 42,650 रुपये इतकी आहे. या गाडीत वेळोवेळी नवनवे बदल पहायला मिळत आहेत आणि ही गाडी खुपच चांगलं प्रदर्शन करत आहे. या गाडीची सीटला स्प्रिंग टाइपमध्ये बनविण्यात आलं आहे. तसेच फ्रंट सस्पेंशन 28% लांब केलं आहे तर रियर स्प्रिंग सस्पेंशन आता 22% एक्स्ट्रा आहे. ज्यामुळे ही बाईक खराब रस्त्यांवरही स्मुथ चालते आणि राइडची मजा बाईक रायडरला घेता येते. या बाईकमध्ये 102cc चं इंजिन, 8.2 ps पॉवर, 8.6 nm टार्क आणि 4 स्पीड गेअरच्या मदतीने बाईक चांगला परफॉरमन्स देते.