वणीत साई हॉस्पिटलमध्ये 24×7 अतिदक्षता विभाग सुरू
लोढा हॉस्पिटल येथे साई हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक यंत्र व तज्ज्ञ डॉक्टरांसह आकस्मीक विभाग सुरू
विवेक पिदूरकर: वणीतील सुपरिचित हॉस्पिटल लोढा हॉस्पिटल येथे साई हॉस्पिटल अतिदक्षता विभाग सुरू झाला आहे. या अतिदक्षता विभागात 24 तास रुग्णांना इमरजन्सी सेवा दिली जाणार आहे. यासाठी मुंबई येथील वैद्यकीय क्षेत्रातील सुप्रसिद्ध तज्ज्ञ डॉ. सूरज चौधरी (MBBS, DNB Medicine) यांच्या मार्गदर्शनात ही रुग्णसेवा सुरू राहणार आहे. आज शनिवारी दिनांक 10 जुलै रोजी या अतिदक्षता विभागाचे साध्या पद्धतीने मान्यवरांच्या उपस्थितीत लोकार्पण करण्यात आले.
लोढा हॉस्पिटल येथे आधी अतिदक्षता विभाग होता. मात्र पुरेशा अत्याधुनिक मशिन व साधनांमुळे सेवा पूर्णवेळ सुरू नव्हती. मात्र आता मुंबई येथील टाटा हॉस्पिटल या सुप्रसिद्ध हॉस्पिटलमध्ये कार्यरत असलेले डॉ. सूरज चौधरी यांनी आता अतिदक्षता विभागाची धुरा सांभाळली असून लोढा हॉस्पिटल येथेच साई हॉस्पिटल या अतिदक्षता सेवा विभागात रुग्णांना दिली जाणार आहे.
अतिदक्षता विभागाचे वैशिष्टे
अतिदक्षता विभागात 24 तास व्हेंटिलेटर सुविधा उपलब्ध राहणार आहे. कोविड 19 न्युमोनिया तज्ज्ञ उपलब्ध राहणार आहे. किडनी डायलिसीस सेंटर, दमा, टीबी ऍलर्जीवरही उपचार केले जाणार आहे. हृदयरोग व त्यासंबंधी आजार, स्ट्रोक, इपीलेप्सी, मधूमेह, हाय ब्लड प्रेशर, थॉयरॉईड्स, सर्पदंश, विषबाधा इत्यादींवरही अतिदक्षता विभागात उपचार केले जाणार आहे. तसेच टीएमटी मशिनद्वारा तपासणीचीही सुविधा आहे. विशेष म्हणजे या अतिदक्षता विभागात देश विदेशातील तज्ज्ञ डॉक्टर ई-क्लिनिकद्वारा मार्गदर्शन आणि क्रिटिकल रुग्णांची तपासणी करणार आहे.
आज शनिवारी दिनांक 10 जुलै रोजी लोढा हॉस्पिटल येथील साई हॉस्पिटल या आकस्मीक व अतिदक्षता विभागाचे साध्या पद्धतीने उद्घाटन करण्यात आले. यावेळी शहरातील डॉक्टरांची तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती.
पत्ता: साई हॉस्पिटल, C/o लोढा हॉस्पिटल
बस स्थानक समोर, वणी