कोरोनाचा वणी तालुक्यात महाविस्फोट

शहरापेक्षा ग्रामीण भागात रुग्णवाढ

0

जब्बार चीनी, वणी: रविवार दिनांक 11 एप्रिल रोजी तालुक्यात शासकीय लॅबनुसार कोरोनाचे 44 रुग्ण आढळून आलेत. यात वणी शहरातील 15 तर ग्रामीण भागातील 42 रुग्णांचा समावेश आहे. रविवारी आलेल्या रुग्णांमुळे तालुक्यातील ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या 296 झाली आहे. मृतकांची संख्या आता 27 झाली आहे. दरम्यान आज विकेंड लॉकडाऊन शहरात शंभर टक्के पाळण्यात आला.

शहरामध्ये एकतानगर येथे 1, जैन ले आऊट 2, रवीनगर 1, शास्त्रीनगर 2, साने गुरुजी नगर 1, एचडीएफसी बॅंक 1, गुरुनगर 1, साईनगर 1, आर. एच. क्वॉर्टर 1, नांदेपेरा रोड 1, प्रगतीनगर 1,वसंतगंगा विहार 1, टिळकनगर 1, छोरिया ले आऊट गणेशपूर 4, मेघदूत कॉलनी चिखलगाव 2, राजूर 1, नायगाव 1, वागदरा 1, वेळाबाई 5, मोहदा 26, पिंपळगाव 1, पद्मावती नगरी लालगुडा 1 असे रुग्ण आढळलेत.

रविवारी यवतमाळ येथून 269 अहवाल प्राप्त झाले. यात 10 जण पॉजिटिव्ह आलेत. तर आज 266 संशयीतांची रॅपिट ऍन्टीजन टेस्ट करण्यात आली. यात 44 व्यक्ती पॉजिटिव्ह आलेत. अद्याप यवतमाळहून 609 संशयीतांचे रिपोर्ट येणे बाकी आहे. आज 13 कोरोनामुक्त व्यक्तींना सुटी देण्यात आली

सध्या तालुक्यात 296 ऍक्टिव्ह रुग्ण (शासकीय लॅबच्या आकड्यानुसार) आहेत. यातील 72 रुग्ण कोविड केअर सेंटरला उपचार घेत आहेत. तर 176 रुग्ण होम आयसोलेट आहेत. 48 रुग्णांवर यवतमाळ व इतर ठिकाणी उपचार सुरू आहे. तालुक्यात कोरोनाचे एकूण 1834 रुग्ण आढळून आलेत. यातील 1511 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर 27 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. (यात बाहेरगावी उपचार सुरू असताना मृत झालेल्या रुग्णांचा समावेश नाही.

हेदेखील वाचा

फोटो स्टुडिओ सकाळी 11 ते 5 पर्यंत सुरू ठेवू देण्याची मागणी

हेखील वाचा

विकेंड लॉकडाउन – वणी शंभर टक्के बंद

Leave A Reply

Your email address will not be published.