कोरोनाचा विस्फोट, आज आढळले तालुक्यात तब्बल 29 रुग्ण
चेंडकापूर ठरले हॉटस्पॉट, एकाच दिवशी आढळले 14 रुग्ण
जब्बार चीनी, वणी: आज तालुक्यात कोरोनाचे रेकॉर्डब्रेक 29 रुग्ण आढळून आलेत. आज आलेल्या रुग्णांमध्ये वणी शहरात 9 रुग्ण आढळून आलेत. यात शास्त्रीनगर येथे 3, गंगाविहार येथे 2 तर जटाशंकर चौक, गुरुनगर व विठ्ठलवाडी येथे प्रत्येकी 1 रुग्ण आढळून आले. ग्रामीण भागात तब्बल 20 रुग्ण आढळून आलेत. यातील एकट्या चेंडकापूर येथे 14 रुग्ण आढळून आलेत. तर गणेशपूर, लालगुडा येथे प्रत्येकी 2 तर भांदेवाडा, भालर वसाहत येथे प्रत्येकी 1 रुग्ण आढळून आला. दरम्यान चेंडकपूर (नेरड) येथे कोरोना रुग्णांना उपचारासाठी नेण्यास आलेल्या आरोग्य यंत्रणेला गावकऱ्यांनी घेराव घातल्याची माहिती आहे. त्यामुळे काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. यावेळी पोलिसांचा मोठा फौजफाटा देखील हजर होता, अशी माहिती आहे.
रविवारी दिनांक 20 मार्च रोजी यवतमाळहून 307 संशयीतांचे रिपोर्ट प्राप्त झाले. यात 25 व्यक्ती पॉजिटिव्ह तर 282 व्यक्ती निगेटिव्ह आलेत. आज 151 संशयीतांची रॅपिट ऍन्टिजन टेस्ट करण्यात आली. यात 4 व्यक्ती पॉजिटिव्ह आलेत तर 147 व्यक्ती निगेटिव्ह आलेत. आज आलेल्या रुग्णांवरून 68 संशयीतांचे स्वॅब यवतमाळ येथे तपासणीसाठी पाठवण्यात आले. अद्याप यवतमाळहून 554 संशयीतांचे रिपोर्ट येणे बाकी आहे.
सध्या तालुक्यात 77 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. यातील 29 रुग्ण होम आयसोलेट आहेत. तर 40 रुग्ण कोविड केअर सेंटरला उपचार घेत आहेत. 8 रुग्णांवर यवतमाळ व इतर ठिकाणी उपचार सुरू आहे. तालुक्यात कोरोनाचे एकूण 1366 रुग्ण आढळून आलेत. यातील 1263 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर 26 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. (यात बाहेरगावी उपचार सुरू असताना मृत झालेल्या रुग्णांचा समावेश नाही.)
हे देखील वाचा: