पोहरादेवी येथे अजित पवार यांचा वाढदिवस साजरा

राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन

0

मानोरा: महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अजित पवार यांचा पोहरादेवी येथील वसंतराव नाईक मूकबधिर विद्यालयामध्ये उपक्रमाद्वारे वाढदिवस साजरा करण्यात आला. डॉ. श्याम विजय जाधव (नाईक) जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (वीजेएनटी) सेल वाशिम तथा संत. श्री. डॉ. रामराव महाराज आरोग्यधाम हॉस्पिटल यांच्यातर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यांचे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून अजित पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी विजय नाईक, पोहरादेवी वसंतनगरचे सरपंच गणेश जाधव, प्रकाश राठोड(देवठाणा), संजय जाधव (उमरी खु), सुनील जाधव (माहुली), ज्ञानेश्वर राठोड, कैलास जाधव, रमेश चव्हाण, किसन जाधव, अनिल चव्हाण तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक वासुदेव राठोड, ठेंगे सर, कांबळे सर, आडे मॅडम, कुणाल राठोड, चव्हाण मॅडम, अनिल राठोड, विनोद पवार उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.