अशोकराव चव्हाण यांची पोहरादेवीला भेट

दुष्काळ व मंदीबाबत केली चिंता व्यक्त

0

मानोरा: मंगळवारी दिनांक 1 सप्टेंबर रविवारी पोहरादेवी येथे महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी पोहरादेवी येथील भक्तीधामला भेट दिली. यावेळी त्यांनी संत सेवालाल महाराज, जगदंबा मातेचे दर्शन घेतले. तसेच संत डॉ. रामराव महाराज यांचा आशीर्वाद घेतला.

भक्तीधाम नंतर सेवालाल महाराज महाविद्यालय येथे सत्कार कार्यक्रम झाला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. श्याम जाधव (नाईक) यांनी केले. यावेळी बोलताना त्यांनी मंदी व त्याचा बंजारा समाजावर होणारा परिणाम यावर चिंता व्यक्त केली. यावेळी बोलताना अशोकराव चव्हाण यांनी दुष्काळाबाबत चिंता व्यक्त केली. तसेच ही मंदी मानवनिर्मित असून या मंदीसाठी सरकारचे धोरण असल्याचेही ते म्हणाले. तसेच त्यांनी बलदेव महाराज यांचे विशेष आभार मानले.

याप्रसंगी बाबुसिंग महाराज, संजय महाराज, बलदेव महाराज, जितेंद्र महाराज, रमेश महाराज, कबीरदास महाराज, जीवन पाटील, अरविंद  इंगोले, अनिल राठोड, इफ्तेकार पटेल शेखर महाराज भक्तराज महाराज राहुल महाराज, यांच्यासह बंजारा समाजातील मान्यवर उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.