अर्धवन येथे ऋषिपंचमी निमित्त महाप्रसादाचे आयोजन

मंगळवारी गजानन महाराजांच्या भक्तांची मांदियाळी

0

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील अर्धवन येथे 3 सप्टेंबर रोजी साधक आश्रम संस्थेद्वारा ऋषिपंचमी निमित्त गजानन महाराज देवस्थानात महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. या निमित्ताने भजन पूजन व इतर इतर धार्मिक कार्यक्रम ही आयोजित केलेले आहेत. तालुक्यातोल अर्धवन येथे गजानन महाराजांचे एकमेव देवस्थान आहे. या स्थळाला छोटे तीर्थक्षेत्र म्हणून तालुक्यातील भाविक या निमित्ताने मोठी गर्दी असते. ऋषीपंचमी निमित्त महाप्रसादाचा लाभ घेण्याचे आवाहन संस्थेचे अध्यक्ष व सदस्य यांनी लोकांना केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.