ख्रिसमस उत्साहात साजरा, सुट्यांत नंदनवन फुलले

चिखलदऱ्यात पर्यटकांची गर्दी

0

सुनील इंदुवामन ठाकरे, अमरावतीः विश्वाला शांतीचा आणि प्रेमाचा संदेश देणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताची जयंती सर्वत्र उत्साहात साजरी झाली. विविध चर्चमध्ये त्यानिमित्त विशेष प्रार्थना, भक्ती आणि अन्य कार्यक्रम झालेत. यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा उत्सव अत्यंत साधेपणाने साजरा केला.

ख्रिसमस हा प्रेमाचा सण आहे. माफी मागण्याचा आणि माफ करण्याचा प्रयत्न यावेळी केला पाहिजे असं ट्रू स्माईल फाउंडेशनच्या अध्यक्ष मॅरिना डॅनियल यांनी सांगितले. ख्रिसमससोबत आलेल्या सलग सुट्यांमुळे विदर्भाचे नंदनवन चिखलदरा फुलले. पर्यटक या सुट्यांचा मनमुराद आनंद चिखलदऱ्यात लुटत आहेत.

मॅरिना डॅनियल म्हणाल्यात की, येशू ख्रिस्ताच्या जन्माचे देखावे घरोघरी तयार करतात. येशूचा जन्म गोशाळेत म्हणजेच गोठ्यात झाला. गोशाळेत शेण, कचरा अशी घाण असते. ते मानवी मनाचं प्रतीक आहे. त्यांना महालात जन्म घेता आला असता. मात्र मानवाच्या मनातली घाण दूर करण्यासाठी त्यांनी हा प्रतीकात्मक जन्म घेतला. ते उद्घारक आहेत, असा ख्रिस्ती बांधवांत विश्वास आहे.

येशू ख्रिस्ताने विश्वप्रेमाचा संदेश दिला. त्यांचे विचार प्रत्यक्ष जीवनात अवलंबणे म्हणजे खऱ्या अर्थाने ख्रिसमस साजरा करणे होय. ख्रिसमसच्या निमित्ताने उघड्या नागड्यांना वस्त्र द्यावीत. भुकेल्यांना अन्न द्यावं. आपसांतील शत्रुत्व मिटवावं. सर्वांवर प्रेम करा, माफ करा हाच ख्रिसमसचा मोठा संदेश आहे. गरिबांसोबत ख्रिसमसचा आनंद साजरा करा.

प्रभू येशूचे विचार आपण आपल्या आयुष्यात आणले पाहिजेत. ईश्वराशी नातं जोडलं पाहिजे. मानवेची शक्य तेवढी सेवा केली पाहिजे असं मॅरिना डॅनियल म्हणाल्यात.

चिखलदरा ‘हाऊसफूल’
शुक्रवारच्या ख्रिसमससोबत शनिवार आणि रविवार अशा सलग सुट्या आल्यात. त्यामुळे अनेकांनी चिखलदरा पर्यटनाचा लाभ घेतला. खवैय्यांनी नेहमीप्रमाणेच खाण्याचा आनंद घेतला. घोडेस्वारीचा आनंद लुटला. बोटिंगचे संचालक गॅमलिएल, जॉर्ज आणि रॉबर्ट डॅनिएल यांनी सांगितले की, पर्यटकांनी बोटिंगचा मनमुराद आस्वाद लुटला. गेल्या अनेक वर्षांपासून सुरक्षित बोटिंगची सेवा डॅनियल परिवार देत आहे. लहानांपासून वृद्धांपर्यंत सर्वच चिखलदऱ्यात बोटिंगचा आनंद घेतात.

ख्रिसमस सर्वत्र उत्साहात साजरा झाला. त्यासोबत आलेल्या सुट्यांचा आस्वादही पर्यटक घेत आहेत. एरवी ख्रिसमस आणि सलग सुट्यांमध्ये चिखलदऱ्यात पर्यटक मोठ्या प्रमाणात येतात. यावर्षीदेखील पर्यटक आलेत. रविवारीदेखील पर्यटक येण्याची शक्यता आहे. काही एक दिवसाकरिता येतात. काही सलग सुट्या चिखलदऱ्यातच घालवण्यचा बेत आखतात.

विल्सन डॅनियल, संचालक, हॉटेल ग्लॅडविन, चिखलदरा

हेदेखील वाचा

अभाविपचे 66 वे अखिल भारतीय अधिवेशन नागपुरात

हेदेखील वाचा

लाख मोलाचा बैल अन् परंपरा ब्रिटिशकालीन

Leave A Reply

Your email address will not be published.