पालकमंत्री संजय राठोड यांचा मानपत्र देऊन गौरव

मानोरा: उमरी-पोहरादेवी परिसरातील तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील तीर्थक्षेत्र उमरी येथे पायाभरणी सोहळा गुरुवारी दि.10 ऑगस्ट रोजी पार पडला. यमरी येथील सामकी माता मंदिर परिसरात या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. पालकमंत्री संजय राठोड यांच्या पाठपुराव्यातून व पुढाकारातून तीर्थक्षेत्र पोहरादेवी व उमरीच्या विकासासाठी 326 कोटी 24 कोटींच्या विकासकामांची पायाभरणी करण्यात आली. यावेळी उमरीवासी व सेवालाल महाराज बहुउद्देशीय संस्था उमरी (खुर्द) चे अध्यक्ष डॉ.श्याम जाधव नाईक यांच्यातर्फे ना. संजय राठोड यांचा मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. तर बंजारा समाजाचे धर्मगुरू महंत बाबुसिंगजी महाराज व महंत यशवंत महाराज यांनी सेवालाल महाराज बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने ना. संजय राठोड यांचा फेटा व समाजाच्या परंपरेनुसार चांदीचा कडा देवून सत्कार केला.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष बंजारा धर्मगुरू संत बाबुसिंग महाराज होते. यावेळी व्यासपिठावर मोहिनी इंद्रनील नाईक, ज्ञानक पाटणी, यशवंत महाराज, शेखर महाराज, जितेंद्र महाराज, बंजारा परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष विलास राठोड, बंजारा सेवा संघाचे कार्याध्यक्ष डॉ. टी.सी. राठोड, रायसिंग महाराज, माजी जि. प. अध्यक्ष दिलीप जाधव, मानोरा पंचायत समिती सभापती सुजाता जाधव, डॉ. शाम जाधव नाईक, दादाराव महाराज, संजय भानावत, बाबुसिंग नाईक, हरीचंद राठोड, ठाकूरसिंग चव्हाण, उमरीचे सरपंच कपिल पवार, पोहरादेवीचे सरपंच विनोद राठोड, गणेश जाधव यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

326 कोटींच्या निधीतून मंदिर परिसरातील बांधकाम, सुशोभीकरण, भाविकांसाठी सोयी-सुविधा, रस्ता, धर्मशाळा, पाणी पुरवठा योजना, बाह्य विद्युतीकरण इत्यादी कामे केली जाणार आहे. बंजारा तीर्थक्षेत्राचा विकास व्हावा हे संत रामराव महाराजांचे स्वप्न होते. मिळालेल्या निधीतून पोहरादेवी व उमरीचा सोयी सुविधायु्क्त तीर्थक्षेत्र म्हणून विकास करण्याचा मानस असून हे जागतिक आध्यात्मिक केंद्र व्हावे यासाठी प्रयत्न करणार असे प्रतिपादन ना. संजय राठोड यांनी केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. श्याम जाधव नाईक यांनी केले यावेळी ते म्हणाले की आधुनिक महाराष्ट्राच्या उभारणीत अनेक बंजारा नेत्यांनी हातभार लावून राज्याच्या विकासाला चालणा दिली. वसंतराव नाईक यांच्या पासून सुरू झालेला हा प्रवास पुढे सुधाकरराव नाईक यांनी पुढे नेला तर आज ना. संजय राठोड हा वासरा यशस्वीरित्या पुढे नेत आहे. शब्द देणे हे एक नेत्यांच्या बाबतीत केवळ औचारिकता असते. पण बोले तैसा चाले या उक्तीवर विश्वास ठेवून चालणारे बोटावर मोजण्या इतकेच असतात. ना. संजय राठोड यांनी जीर्णोद्धाराच्या कामासाठी पुढाकार घेतला व आपल्या कतृत्व आणि प्रेरणेतून आज हा दिवस उदयास आला, असे मनोगत डॉ. श्याम जाधव नाईक यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाला परिसरातील हजारो नागरिक उपस्थित होते.

यावेळी धर्मगुरू महंत बाबूसिंग महाराज, महंत यशवंत महाराज, मोहिनी इंद्रनील नाईक, ज्ञानक पाटणी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन प्रा. किशोर राठोड यांनी केले तर उपस्थितांचे आभार डॉ. अर्जून जाधव यांनी मानले. कार्यक्रमाला परिसरातील हजारो नागरिक उपस्थित होते.

Comments are closed.