ज्येष्ठ योग शिक्षक रमेश ददगाल यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

चंद्रपूर व राजुरा येथील विविध योगप्रेमींची उपस्थिती

चंद्रपूर: शहरातील ज्येष्ठ योग शिक्षक रमेश ददगाल यांचा चंद्रपूर येथील हॉटेल राजवाडा येथे 74 वा वाढदिवस साजरा करण्यात आला. सर्वयोग प्रेमी चंद्रपूर, राजुरा येथील साधक साधिका तसेच ददगाल यांच्या नातेवाईकांच्या उपस्थितीत हा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी उपस्थितांतर्फे शाल आणि बुके देऊन ददगाल यांचा सत्कार करण्यात आला.

Podar School 2025

कार्यक्रमाचे प्रास्ताविक खोडे सर यांनी केले तर भारत स्वाभिमानचे जिल्हा अध्यक्ष विजय चंदावार यांनी ददगाल यांच्या कार्याविषयी उपस्थितांना माहिती दिली. ददगाल यांचे जावई अतुल, मुलगी मेघा, नात लावण्या व नातू ओम मावळे यांनी यावेळी ददगाल यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी रमेश ददगाल यांनी आपले मनोगत देखील व्यक्त केले.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

योगामुळेच आज निरोगी आहे – रमेश ददगाल
गेल्या अनेक वर्षांपासून मी योगा करीत आहे. त्यामुळेच आज मी निरोगी आहे. सध्याच्या आधुनिक आणि धावपळीच्या जीवनामध्ये आपण सर्व काम करतो. परंतु आपल्या शरीराकडे लक्ष देण्यात पुरेसा वेळ मिळत नाही. त्यामुळे आपल्या शरीरावर आपले दुर्लक्ष होते. व्यायामाचे आणि योगाचे आपल्या आयुष्यामध्ये खूप महत्त्वाचे स्थान आहे. रोज योगा केल्याने आपल्या जीवनातील ताण तणाव नाहीसा होतो. त्यामुळे खेडोपाडीही योगाचा प्रचार आणि प्रसार झाला पाहिजे.
– रमेश ददगाल, ज्येष्ठ योग शिक्षक

कार्यक्रमाला चंद्रपूर येथील तुकुम मधील महिला योगा क्लास, तुकुम येथील पुरुष योगा क्लास, लॉ कॉलेज योगा क्लास, छत्रपती योगा क्लास, जे बी नगर येथील नवजीवन योगा क्लास, गजानन मंदिर येथील योगा क्लास तसेच ब्रिलियंट स्कूलचे टीचर स्टाफ, आरटीओ स्टाफ यांच्यासह मुंधडा सर, सुभाष कासनगोटुवार, सपना नामपल्लिवार, सुधाकरराव श्रीपुरवार, शिरभये सर, डोरलीकर सर, शेलोटे सर, पुष्पाताई, अल्काताई, बबनराव धर्मपुरीवर यांची उपस्थिती होती. स्नेहभोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली.

Comments are closed.