झोपून असलेल्या इसमाला दगडाने मारहाण

मध्यरात्री घडला थरार... आरोपीला अटक

0

विवेक तोटेवार, वणी: झोपून असलेल्या इसमाला दगडाने वार करून जखमी केल्याची घटना वणीत घडली. सोमवार दिनांक 12 ऑक्टोबर रोजी मध्यरात्री 12 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. या प्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली आहे. 

अनंता तुकाराम ढोरे (52) यांचे आंबेडकर चौकात जोडे, चप्पल व बूट पॉलिशचे दुकान आहे. नेहमीप्रमाणे सोमवारी रात्री ते दुकानाच्या बाहेर झोपून होते. त्यावेळी आरोपी नरेंद्र आत्माराम कांबळे (36) हा तिथे आला व त्याने अनंताच्या डोक्यावर दगडाने हल्ला केला. या हल्ल्यात अनंताच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.

अनंताला जखमी अवस्थेत आधी वणीच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर त्यांना वणीच्या एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. सध्या त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असून त्यांना दवाखान्यातून सुट्टी मिळाल्याची माहिती आहे.

घटनेनंतर अनंताच्या मुलाने वणी पोलिसात आरोपीविरुद्ध तक्रार दिली. तक्रारीवरून वणी पोलिसात नरेंद्र विरुद्ध कलम 324 नुसार गुन्हा दाखल केला. आरोपी नरेंद्र याला तात्काळ अटक करण्यात आली. सदर घटनेचा तपास वणी पोलीस ठाण्याचे कर्मचारी अनंता इरपाते करीत आहे. सदर घटना दारु आणण्यासाठी पैसे दिल्याच्या वादातून घडल्याची माहिती आहे.

(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)

Leave A Reply

Your email address will not be published.