वणी तालुक्यात दोन दिवसांमध्ये 2 शेतक-यांची आत्महत्या

मारेगाव तालुक्यानंतर आता वणी तालुक्यातही आत्महत्येचे सत्र

0

जितेंद्र कोठारी, वणी: मारेगाव तालुक्यानंतर आता वणी तालुक्यातही आत्महत्येचे सुत्र पुन्हा सुरू झाले आहे. दोन दिवसात दोन शेतक-यांनी आत्महत्या करून आपली जीवनयात्रा संपवली. यातील एक घटना ही आमलोन येथील असून दुसरी घटना ही सोनेगाव येथील आहे. प्रभाकर भीमराव उईके (65) रा. आमलोन व नामदेव रोडबा वाघाडे (60) रा. सोनेगाव असे आत्महत्या करणा-या शेतक-यांचे नाव आहेत.

प्रभाकर उईके हे आमलोन येथील रहिवाशी होते. त्यांनी सोमवारी दुपारी 2 वाजताच्या दरम्यान विषारी द्रव्य प्राषण केले. ही बाब त्यांच्या कुटुंबीयांच्या लक्षात येताच त्यांना त्तात्काळ मुकुटबन येथील आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल कऱण्यात आले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने त्यांना वणी येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत केले.

दुस-या घटनेत नामदेव रोडबा वाघाडे (60) हे सोनेगाव येथील रहिवाशी होते. त्यांनी रविवारी रात्री विषारी द्रव्य प्राषण केले. त्यामुळे त्यांना उपचारासाठी चंद्रपूर येथे हलवण्यात आले. मात्र दोन दिवसांनी म्हणजेत मंगळवारी दुपारी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी व दोन मुले असा परिवार आहे.

मारेगाव तालुक्यातील सततच्या आत्महत्येने जिल्हा हादरल्यानंतर आता आत्महत्येच्या घटना वणीत देखील वाढायला सुरुवात झाली आहे. दोन दिवसांच्या अंतराने दोघांचा आत्महत्या केल्याने मृत्यू झाला आहे. ही एक गंभीर बाब आहे.

हे देखील वाचा:

अबब…! एक दिवसात केला तब्बल 600 ब्रासचा रेतीसाठा

साईनगरीत रस्त्याचे रूपांतर झाले तलावात

देशी दारूभट्टी समोर थरार, तरुणावर दगडाने हल्ला

Leave A Reply

Your email address will not be published.