देशी दारूभट्टी समोर थरार, तरुणावर दगडाने हल्ला

दारुसाठी पैसे न दिल्याच्या रागातून घडली घटना

0

जितेंद्र कोठारी, वणी: दारूसाठी पैसे न दिल्याने एका व्यक्तीने दुस-या व्यक्तीला मारहाण करत त्याच्या डोक्यावर दगडाने प्रहार केला. रविवारी संध्याकाळी 6 वाजताच्या सुमारास कायर येथील दारूभट्टीसमोर हा थरार घडला. या प्रकरणी आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, तर जखमीवर उपचार सुरू आहे.

सविस्तर वृत्त असे की आरोपी दीपक रामलू शिंगीडवर (28) हा कायर येथील रहिवाशी आहे. त्याला दारू पिण्याचे व्यसन असल्याची माहिती आहे. रविवारी दिनांक 13 जून रोजी संध्याकाळी 6 वाजताच्या सुमारास परसोडा येथील रहिवाशी असलेला पुरुषोत्तम मुरलीधर बोर्डे (36) हा कायर येथील देशी दारुच्या भट्टीसमोर उभा होता. दरम्यान तिथे दीपक आला व त्याने पुरुषोत्तमजवळ दारूसाठी पैशाची मागणी केली.

पुरुषोत्तमने पैसे नसल्याचे सांगून दीपकला तिथे जायला सांगितले. मात्र दीपक वारंवार पैसे मागत होता. अखेर पैसे न दिल्याच्या रागातून संतप्त झालेल्या दीपकने पुरुषोत्तमला खाली पाडले व मारहाण करायला सुरूवात केली. दीपक एवढ्यावरच थांबला नाही तर त्याने पुरुषोत्तमच्या डोक्यावर जवळच असलेला दगड उचलून प्रहार केला. या मारहाणीत पुरुषोत्तम गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

या प्रकरणी जखमी पुरुषोत्तमची आई कांताबाई बोर्डे यांनी शिरपूर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. या प्रकरणी आरोपी दीपक रामलू शिंगीडवार रा. कायर याच्याविरोधात भादंविच्या कलम 307 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा तपास ठाणेदार सचिन लुले यांच्या मार्गदर्शनात शिरपूर पोलीस करीत आहे.

हे देखील वाचा:

अबब…! एक दिवसात केला तब्बल 600 ब्रासचा रेतीसाठा

करा आपले लॅपटॉप/कॉम्प्युटर फास्ट व अप टू डेट

आझाद इलेक्ट्रॉनिक्समध्ये होलसेल दरात खरेदी करा फवारणी पम्प

Leave A Reply

Your email address will not be published.