मारेगाव तालुक्यात आज 4 पॉझिटिव्ह

रुग्णांवर यवतमाळ व वर्धा येथे उपचार सुरू

0

नागेश रायपुरे, मारेगाव: आरोग्य विभागाला आज 25 सप्टेंबर रोजी मिळालेल्या अहवालात तालुक्यात आज पुन्हा 4 पॉझिटिव्ह निष्पन्न झाले आहे. यात मारेगाव, हिवरी, कोथुर्ला या तीन गावातील रुग्णांचा समावेश आहे. तालुक्यात आता ऍक्टिव्ह रुग्णाची संख्या 17 आहे.

आज आलेल्या रुग्णांमध्ये मारेगाव येथील 2 पुरूष, हिवरी व कोथुर्ला येथे प्रत्येकी 1 पुरुष आहे. या रुग्णांवर सध्या यवतमाळ व वर्धा येथे उपचार सुरू आहे. तालुक्यात कोरोना पॉझिटिव्ह रुगणाचा आकडा 57 झाला असून ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या 17 आहे. उर्वरीत रुग्ण उपचार घेऊन बरे झाले आहे.

तालुक्यात रेपीड टेस्ट द्वारे 737 तर आरटी पीसीआर द्वारे 624 व्यक्तीच्या तपासणी आरोग्य विभागाने केल्या आहेत. आज आढळलेल्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या थेट संपर्कात आलेल्या व्यक्तीना ट्रेस करणे व त्यांचे घराचा परिसर सील करण्याची प्रक्रिया चालू आहे.

‘माझं कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिमेस सहकार्य करा: डॉ. अर्चना देठे
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रत्येक गावा गावात तपासणी शिबिरे घेतली जात आहे. माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमे अंतर्गत नागरिकांनी मनात कोणतेही तमा न बाळगता तपासणी करावी व प्रशासनास सहकार्य करावे
– डॉ. अर्चना देठे, तालुका वैद्यकीय अधिकारी

(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.