भालर येथे वाघाच्या हल्ल्यात 4 गायी, 1 बैल ठार

वन विभागाकडे नुकसान भरपाईची मागणी

0

जितेंद्र कोठारी, वणी: तालुक्यातील भालर परिसरात मागील एका महिन्यापासून पट्टेदार वाघाने 4 गायी व 1 बैलावर हल्ला करून ठार केल्याची घटना घडली. वाघाच्या हल्यात ठार जनावरांच्या मालकाने याबाबत वन विभागाकडे तक्रार करून नुकसान भरपाईची मागणी केली आहे.

प्राप्त माहितीनुसार भालर येथील शेतकरी भारत सुभाष दुर्गे यांच्या शेतात 29 डिसेंबर रोजी दुपारी चरत असलेल्या गायीवर दबा धरून बसलेल्या एका पट्टेदार वाघाने हल्ला चढविला. वाघाच्या हल्यात दुर्गे यांची गाय जागीच ठार झाली. या घटनेत शेतकरी भारत दुर्गे यांच्या 50 हजार रुपयांचा नुकसान झाले.

भालर येथीलच शेतकरी अशोक राघोबाजी देठे, प्रमोद पिदूरकर व गजानन लक्ष्मण बोडे यांच्या मालकीची 3 गायी व 1 बैलसुद्दा ठार झाल्याची घटना मागील एका महिन्यात घडली आहे. भालर परिसरात वाघाचे मुक्त संचार सुरू असल्याचे नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे.

ठार झालेल्या जनावरांच्या मालकाने वन परिक्षेत्राधिकारी, वन विभाग वणी यांच्याकडे तक्रार देऊन नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे. या परिसरात सातत्याने वाघांचे जनावरांवर हल्ले होत आहे.

हे पण वाचा : 

वणी बहुगुणीच्या एक महिन्याच्या जाहिरातीवर एक महिना फ्री

हे पण वाचा : 

वन प्लस टीव्ही ऑनलाईनपेक्षाही कमी दरात आझाद इलेक्ट्राॅनिक्समध्ये

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.