४५ लाखांच्या निधीतून करणार विकास कामे

0

रफीक कनोजे, झरी: झरीला नगरपंचायत निवडणूक होऊन दोन वर्ष पूर्ण होऊन तिसरे वर्ष सुरु झाले आहे. परंतु दोन वर्षांत एकही ठोस विकास काम झालेले नाही. झरी नगरपंचायत मध्ये १७ वॉर्ड असून १७ नगरसेवक २ स्वीकृत सदस्य व मुख्याधिकारी आहे. गेल्या दोन वर्षात सतरा ही वार्डात रस्ते, नाली, सभागृह व इतर कोणत्याही समस्यांचे ठोस निराकरण केले नसल्याने नगरपंचायतच्या सतराही वॉर्डातील जनतेत नगरसेवकाबाबत प्रचंड रोष निर्माण झाला आहे.

मागच्या बांधकाम सभापतीने असे कोणतेही ठोस निर्णय घेतले नव्हते याच अनुषंगाने नवनिर्वाचित बांधकाम सभापती शांता जीवतोडे (कापसे) यांनी नवीन नगरपंचायत सहाय्य निधी २५ लाख व रस्ता विकास निधी २० लाख असा ४५ लाख रुपयांचा निधी सभागृह, काही वार्डातील ८ ते ९ नाल्या व अतिक्रमण हटविलेल्या जागेवर गाळे बनविण्यासाठी वापरण्याता निश्चय केला आहे.तसा ठराव सुद्धा २८ नोव्हेंबरच्या विशेष सभेत मंजूर करून घेतला आहे.

नवीन नगरपंचायत निधी ६ औक्टोंबर २०१७ रोजी प्राप्त झाला असून बांधकामाचा ठराव क्र ४ आहे. बांधकाम सभापती ने घेतलेल्या निर्णयाचे स्वागत होत असून वरील कामे टेंडर काढून लवकरात लवकर होणार असल्याचे सांगितले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.