कराटे बेल्ट ग्रेडेशन परीक्षेत वणीचे 47 विद्यार्थी उत्तीर्ण
आमदार बोदकुरवार व नितीन भूतडा यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा सत्कार
पुरुषोत्तम नवघरे, वणी: कराटे बेल्ट ग्रेडेशन परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या 47 विद्यार्थ्यांचा शहरातील नगरभवन येथे सत्कार करण्यात आला. या परीक्षेत 1 ब्राऊन बेल्ट, मेरुन बेल्ट 5, ब्ल्यु बेल्ट 7, ग्रिन बेल्ट 10, ऑरेन्ज बेल्ट 10 आणि 16 विद्यार्थ्यांना येलो बेल्ट मिळाला. भाजपचे जिल्हाध्यक्ष नितीन भूतडा व आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना सन्मान करण्यात आला. नियुद्ध फेडरेशन ऑफ ईंडीया व ताईची असोसिएशन इंडीयाद्वारा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या सर्व विद्यार्थ्यांना कराटे प्रशिक्षक कैलाश बिडकर यांनी मार्गदर्शन केले आहे.
सदरील विद्यार्थ्यांचे बेल्ट ग्रेडेशन चंद्रपूर येथील प्रशिक्षक विनोद पुणेकर, निर्धार आसुटकर, विशाल चव्हाण यांनी घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विलास जाधव यांनी केले. उत्तीर्ण विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र व बेल्ट देऊन गौरवण्यात आले. यावेळी नितीन भूतडा व आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी विद्यार्थ्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाला संजय पिंपळशेंडे, तारेंद्र बोर्डे, .राजूभाऊ पडगीलवार, रवि बेलुरकर, प्रफुल्ल चव्हाण, प्रतीक कुलसंगे, दिनकर पावडे, बंडू चांदेकर, संध्या अवताडे, प्रीती बिडकर, पूजा जाधव, दिप्ती ऊईके, आशिष सिसोदिया इत्यादींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी मान्यवरांनी विद्यार्थ्यांसह प्रशिक्षक कैलाश बिडकर यांचेही अभिनंदन केले.
हे देखील वाचा:
वणीकरांचा मनसेला कौल… पण सर्व विरोधकांची एकी: वारे नगरपालिकेचे भाग 9
Comments are closed.