जितेंद्र कोठारी, वणी: सोने चकाकून देण्याची बतावणी करत शहरातील एका व्यापा-याच्या घरी भामट्यांनी डल्ला मारत 7 तोळे सोने लंपास केले. आज सकाळी 10.30 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. विशेष म्हणजे आज याच वेळी मारेगाव येथे एका घरी भामट्यांनी अशाच पद्धतीने बतावणी करत 5 तोळे सोने लंपास केले. दरम्यान वणी येथील भामटे सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहे. त्यांना शोधण्याचे आता वणी पोलिसांसमोर आहे.
सविस्तर वृत्त असे की नटराज चौक येथील वास्तव्यास एका व्यापाऱ्याच्या घरी सकाळी 10.30 वाजता दरम्यान 25 ते 30 वयोगटातील 2 इसम आले. त्यांनी टाईल्स व पितळी भांडे चमकविण्याचा पावडर उत्पादन कंपनीचे प्रतिनिधी असल्याचे सांगितले. त्यावेळी व्यापाऱ्याची पत्नी व आई घरी होते. त्या भामट्यांनी आपल्या जवळील पावडर लावून पितळेची मूर्ती चमकवून दाखवली. त्यानंतर त्या महिलेच्या बोटातील सोन्याची आंगठीही चमकवून दिली.
दोघांच्या गोडगुलाबी गोष्टीत हिरावून घरातील महिलांनी सोन्याच्या 4 बांगड्या वजन 7 तोळा साफ करण्यासाठी दिले. स्वयंपाक घरात गरम पाण्यात बांगड्या उकळण्याचे सांगून एक चोरटा स्वयंपाक खोलीत शिरला. त्यावेळी नजर चुकवून त्यांनी पाण्यातून बांगड्या काढून दोघांनी तिथून पळ काढला.
व्यापाऱ्याच्या घरुन तब्बल 7 तोळा सोन्याची बांगड्या भामट्यांनी लुटले, मात्र पोलिसांनी जबानी फिर्यादमध्ये फक्त 7 ग्राम सोनं किंमत 30 हजार नमूद केले. परंतु तक्रारदार यांनी बांगड्या 70 ग्रामची असल्याचे नमूद करा. याबाबत विनंती केली असता ठाणेदार महल्ले यांनी तक्रारदार याना सोन्याचा बिल दाखवा असे म्हटले. तेव्हा तक्रारदार व्यापाऱ्यांची पत्नी यांनी 2 बांगड्या 40 वर्षांपूर्वीची व 2 बांगड्या 30 वर्षांपूर्वीची असल्यामुळे बिल शक्य नाही असे सांगितले. अखेर तक्रारीत 7 तोळा सोना किंमत 40 हजार रुपये असे दाखल करण्यात आले.
डॉक्टरच्या घरी ही प्रयत्न
घटनेच्या आधी या दोन भामट्यांनी व्यापा-याच्या मागील गल्लीत एका डॉक्टरच्या घरी असाच शिरण्याचा प्रयत्न केला. मात्र त्या घरातील महिलांनी त्या दोघांना हाकलून दिले. शिवाय ज्यावेळी वणी येथील घटना घडली. त्याच वेळी मारेगाव येथे हीच मॉडस ऑपरेंडी वापरून एका सेवानिवृत्त शिक्षकाच्या घरातील 5 तोळ्याचे सोने लुटले गेले. त्यामुळे ही टोळी असून पोलिसांसमोर या टोळीचा पर्दाफाश करण्याचे आव्हान आहे.
या प्रकरणी फिर्यादी महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी 2 अज्ञात व्यक्ती विरुद्ध कलम 420, 34 अनव्ये गुन्हा दाखल केला आहे.
हे देखील वाचा:
…. जेव्हा चिखलगावच्या शाळेत मुलं पळवायला शिरतात दोन अज्ञात !
Comments are closed.