जितेंद्र कोठारी, वणी: शेतात काम करून परत घराकडे निघालेल्या शेतमजुराच्या अंगावर वीज कोसळली. यात तो जागीच ठार झाला. ही घटना तालुक्यातील बोरगाव (मेंढोली) येथे घडली. संजय दिवाणजी पहुरकर (45) रा. बोरगाव (मे) असे मृतक शेतमजुराचे नाव आहे. रविवार 2 सप्टे. रोजी सायंकाळी 5 वाजता दरम्यान ही घटना उघडकीस आली.
प्राप्त माहितीनुसार मृतक संजय हा बोरगाव (मेंढोली) येथील पोलीस पाटील प्रदीप बलकी यांचे शेतात सालगडी म्हणून कामावर होता. रविवारी शेतातील सोयाबीन पिकावर फवारणी करून संजय हा सायंकाळी 5 वाजता घरी जाण्यासाठी निघाला होता. त्याचवेळी आभाळ दाटले आणि विजेचा कडकडाट सुरू झाला. दरम्यान संजय यांच्या अंगावर वीज कोसळली. यात तो जागीच ठार झाला.
सायंकाळ होऊन ही सालगडी संजय घरी परत आला नाही. त्यामुळे शेतमालक प्रदीप बलकी हे मोटारसायकल घेऊन त्याच्या शोधात निघाले. शेतात पोहचले असता संजय हा निपचित पडून असल्याचे दिसून आले. त्यांनी तत्काळ त्याला शिरपूर प्राथमिक रुग्णालयात दाखल केला असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
घटनेबाबत शिरपूर पोलिसांना कळविण्यात आले. पोलिसांनी मृतक संजय पहुरकर याच्या मृतदेहाचा पंचनामा करून उत्तरीय तपासणीसाठी वणी ग्रामीण रुग्णालयात पाठविला. मृतक याच्या मागे आई, पत्नी व एक मुलगी आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
हे देखील वाचा:
Comments are closed.