शेतक-याची शेतात विश प्राशन करून आत्महत्या

म्हैसदोडका येथील घटना, मारेगाव तालुक्यात आत्महत्येचे सत्र सुरूच

भास्कर राऊत, मारेगाव: तालुक्यातील आत्महत्येचे सत्र सुरूच आहे. दर आठवड्यात सुमारे दोन आत्महत्या तालुक्यात होत आहे. आज म्हैसदोडका येथील एका तरुण शेतक-याने विष प्राशन करून आत्महत्या केली. दुपारी 12.30 वाजताच्या दरम्यान ही घटना घडली. सूरज विठ्ठल घागी (28) असे मृतकाचे नाव आहे.

सूरज हा म्हैसदोडका येथील रहिवाशी होता. त्याच्या आई वडिलांचा काही वर्षांपूर्वी मृत्यू झाला. त्यांच्याकडे सुमारे 6 एकर शेती आहे. चार भाऊ ते शेती करायचे. शेतीसह सूरज ट्रॅक्टर चालक म्हणूनही काम करीत होता. आज दुपारी 12.30 वाजताच्या सुमारास त्याने शेतातील बंड्यात विश प्राशन केले. त्यांच्या कुटुंबीयांच्या ही बाब लक्षात येताच त्याला मारेगाव येथील ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

मात्र डॉक्टरांनी सूरजला मृत घोषीत केले. सूरज अविवाहित होता. त्याने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल का उचलले हे अद्याप स्पष्ट झाले नाही. सततच्या आत्महत्येमुळे मारेगाव तालुका कुप्रसिद्ध होत आहे. मात्र याकडे अद्यापही प्रशासन आणि लोकप्रतिनिधींचे कायमच दुर्लक्ष होत आहे.

हे देखील वाचा:

अखेर बेपत्ता असलेल्या राजेंद्रचाही मृतदेह आढळला

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.