जितेंद्र कोठारी, वणी : मैदानात फिरायला गेलेल्या दोघांना टोळक्यांनी जबर मारहाण केली. जखमी युवकांच्या तक्रारीवरून वणी पोलिसांनी 5 तरुणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी प्रथमेश (18) रा.सुभाषचंद्र चौक व नयन (18) रा. माळीपुरा यांनी याबाबत पोलीस स्टेशन मध्ये रविवार 10 सप्टे. रोजी तक्रार नोंदविली.
तक्रारीनुसार, फिर्यादी हे शिक्षण घेत असून रविवारी सुट्टी असल्याने दोघे सकाळी 11 वाजता जनता विद्यालयाच्या मैदानात फिरायला गेले होते. त्यावेळी मैदानात काही मुलं घोळका करून बसले होते. फिर्यादी यांनी त्यांच्याकडे सहज बघितले असता त्यातील गैर अर्जदार युवक जवळ येऊन आमच्याकडे का बघत आहे असे म्हणत शिवीगाळ केली.
फिर्यादी यांनी त्याना समजविण्याचा प्रयत्न केला असता तिघांनी अचानक हल्ला चढविला. गुंड प्रवृत्तीच्या त्या मुलांनी दोघाच्या तोंडावर, मानेवर, कमरेवर व पाठीवर मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यामुळे फिर्यादीच्या तोंडातून व नाकातून रक्त निघू लागले. हल्लेखोर मुलांच्या तावडीतून कसेबसे जीव वाचून पळून जाताना त्या टोळक्यांनी पोलिसात तक्रार केली तर घरात घुसून तुमचा मर्डर करू, अशी धमकी दिली.
घाबरलेल्या परीस्थितीत फिर्यादी यांनी पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदविली. आरोपी हे हिंसक आणि गुंडगिरी प्रवृत्तीचे असून त्यांच्यापासून धोका असल्याचा संशय त्यांनी तक्रारीत नमूद केला आहे. तक्रारीवरून पोलिसांनी 5 आरोपींविरोधात भादंविच्या कलम 143, 147, 148, 149, 294, 506 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. प्रकरणाचा तपास वणी पोलीस करीत आहे.
Comments are closed.