अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवले

शौचास गेलेली मुलगी घरी परतलीच नाही

0
53
प्रातिनिधिक फोटो

जितेंद्र कोठारी, वणी: सोळा वर्षीय कुमारिकेला एका अज्ञात इसमाने फूस लावून पळवून नेल्याची घटना शिरपूर पोलीस स्टेशन अंतर्गत येणा-या एका गावात घडली. शौचास जाण्याचे कारण सांगून मुलगी घरून निघाली होती. मात्र त्यानंतर ती घरी परतलीच नाही. अखेर मुलीच्या वडिलांनी पोलीस स्टेशन गाठत याबाबत तक्रार दाखल केली.

तक्रारीनुसार, पीडिता ही तिच्या आईवडिलांसह शिरपूर पोलीस स्टेशन अंतर्गत येणा-या एका गावात राहते. तिचे वडील मजुरी करतात. शुक्रवारी दिनांक 10 मार्च रोजी दुपारी 1 वाजताच्या सुमारास पीडिता ही घरून शौचास जाण्याचे कारण सांगून घराबाहेर पडली. मात्र बराच वेळ मुलगी न आल्याने तिच्या कुटुंबीयांनी गावात मुलीचा शोध घेण्यास सुरूवात केली. मात्र ती आढळून आली नाही.

त्यानंतर मुलीच्या पालकांनी विविध ठिकाणी नातेवाईकांकडे फोन लावून याबाबत विचारण केली. मात्र त्यांना मुलीचा शोध लागला नाही. दरम्यान त्यांना गावातील कुणी फूस लावून पळवून नेल्याचा संशय आला. त्यामुळे त्यांनी शिरपूर पोलीस स्टेशन गाठत याबाबत तक्रार दाखल केली. पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात भादंविच्या कलम 363 नुसार गुन्हा दाखल केला आहे. मुलीचा शोध शिरपूर पोलीस घेत आहे.

शौचास जाण्याचे कारण सांगून अल्पवयीन मुली गायब
ग्रामीण भागात अनेक घरी शौचालय नसल्याने अनेक जण बाहेर शौचास जातात. शौचास जाण्याचे कारण देऊन घराबाहेर निघालेल्या मुली सध्या घरी परतत नसल्याच्या दोन दिवसांत दोन घटना समोर आल्या आहेत. शनिवारी मारेगाव तालुक्यातील एक मुलगी अशी शौचाचे कारण देऊन घरून पळून गेली होती. तर वणी तालुक्यातही अशीच घटना समोर आली आहे. त्यामुळे पालकांची चिंता वाढली आहे.

हे देखील वाचा: 

शौचास गेलेल्या मुलीला फूस लावून पळवले, मुलीवर अत्याचार

दारु पिण्यास पैसे न दिल्याने काठीने बेदम मारहाण

Relief Physiotherapy clinic
Previous articleगौरकार कॉलनीतील रस्त्याच्या कामाला अखेर सुरुवात
Next articleभर रहदारीच्या रस्त्यात रिव्हॉल्वरचा धाक दाखवून डॉक्टरचे अपहरण
निकेश जिलठे - संपादक वणी बहुगुणी 2007 पासूून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. ग्रामीण व शहरी असा पत्रकारितेचा अनुभव. आजतक, झी, जय महाराष्ट्र, टीव्ही 9 इत्यादी आघाडीच्या टीव्ही मीडियात मुंबई येथे विविध पदावर 10 वर्ष कार्यरत. सध्या एका पीआर एजन्सीचे संचालक तसेच वणी बहुगुणी या वेबसाईटचे मुख्य संपादक. यवतमाळ जिल्ह्यातील पहिले न्यूज पोर्टल वणी बहुगुणी या स्थानिक न्यूज पोर्टलच्या माध्यमातून परिसरातील ज्येष्ठ व नव्या दमाच्या पत्रकारांसह वणी व परिसरातील बातम्या व ताज्या घडामोडी पोहोचवण्याचा एक प्रयत्न. सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक विषयावर विविध माध्यमात लिखाण. राज्यातील अनेक ज्येष्ठ नेते व मंत्री यांचे मीडिया कन्सलटन्ट म्हणूनही कार्य.
Loading...