सुशील ओझा, झरी: तालुक्यातील निंबादेवी परिसरात वाघाने एका गो-ह्याची शिकार केली. गावापासून अगदी 200 मीटर अंतरावर ही घटना घडली. सोमवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. निंबादेवी जवळच असलेल्या पिवरडोल येथे गावालगचत वाघाने एका तरुणाचा फडशा पाडला होता. त्यानंतर निंबादेवीत देखील वाघाने गावाजवळच शिकार केली आहे. त्यामुळे नागरिक दहशतीत आले आहे. .
तालुक्यातील निंबादेवी येथील शेतकरी संतोष धुर्वे यांच्या मालकीचा गो-हा गावालगतच चरत होता. दरम्यान दबा धरून बसलेल्या वाघाने संधी साधून गो-याची शिकार केली. गो-हा दिसत नसल्याने धुर्वे यांनी परिसरात शोध घेतला. निंबादेवी शिवारात अगदी गावाच्या 200 मीटरच्या अंतरावर गो-हा मृत अवस्थेत आढळून आला. त्याचे लचके तोडण्यात आले होते.
रविवारी 1 ऑगस्ट रोजी संध्याकाळच्या सुमारास ही घटना घडली असावी असा अंदाज आहे. वनविभागाला सूचना देण्यात आली. वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी पोहचून पंचनामा करण्यात आला. निंबादेवी गावालगत असलेल्या पिवरडोल येथे काही दिवसांआधी एका तरुणाचा वाघाने फडशा पाडला होता. त्यानंतर वाघाला जेरबंद करण्यात आले होते. मात्र आता पुन्हा गावालगतच वाघाने शिकार केल्याने नागरिक दहशतीत आले आहे.
हे देखील वाचा:
खुमासदार राजकीय टोलेबाजीत रंगला पतसंस्थेचा शाखा उद्घाटन सोहळा
मुकुटबन पोलीस स्टेशनचे वादग्रस्त ठाणेदारांसह 3 कर्मचारी निलंबित