मारेगाव येथे अनेक दिवसांपासून आधार केंद्र बंद
जिल्हा व्यवस्थापकांचे दुर्लक्ष, नागरिकांना त्रास
नागेश रायपुरे, मारेगाव: गेल्या अनेक दिवसांपासून मारेगाव शहरातील आधार कार्ड केंद्र ऑपरेटर अभावी बंद आहे. त्यामुळे नागरिकांच्या अनेक कामात अडथळा होत आहे. मात्र यावर आधार महाऑनलाईन च्या जिल्हा व्यवस्थापकाचे दुर्लक्ष होत आहे.
मारेगाव तालुक्यात मार्डी येथे ग्राम पंचायतमध्ये एक तर शहरात दोन असे तीन महाऑनलाईनचे आधार केंद्र आहे. तर पोस्ट ऑफिसमध्ये एक शासकीय आधार केंद्र आहे. शहरात तहसील कार्यालय मधील असलेले आधार केंद्र अनेक दिवसांपासून बंद आहे. तर नगर पंचायत मधील आधार केंद्र ऑपरेटर अभावी गेल्या वर्ष भरा पासून बंद आहे. तर पोस्ट ऑफिस मधील सुद्धा आधार केंद्र सुद्ध कधी बंद तर कधी सुरू असते.
बॅंकेचे कामा करिता, राशन कार्ड साठी आदी सगळ्याच ठिकाणी आधार कार्ड सक्तीचे आहे. मात्र शहरातील आधार कार्ड केंद्र बंद असल्याने अनेक नागरिकांची कामे खोळंबली आहे. यावर प्रशासनानी लक्ष देऊन तात्काळ आधार केंद्र चालू करावे अशी मागणी नागरिकां कडून होत आहे.
वेळोवेळी पत्रव्यवहार केला आहे: आशिष येरणे
ऑफरेटर ऍक्टिव्ह करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात वेळो वेळी पत्रव्यवहार केला आहे. मात्र कुठलीच दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. गेल्या वर्षभरापासून केंद्र बंद आहे.
– आशिष येरणे – व्यवस्थापक आधार केंद्र
हे देखील वाचा: