भरधाव ट्रकने दुचाकीस्वाराला चिरडले, मुकुटबन रोडवर भीषण अपघात

विवेक तोटेवार, वणी: एका भरधाव ट्रकने दुचाकीला जबर धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार चिरडून त्याचा जागीच मृत्यू झाला. 7 मे रोजी रात्री 11 वाजताच्या सुमारास मुकुडबन रोडवर ही घटना घडली. संजय शिवभगवान गोयनका (50) असे मृतकाचे नाव आहे. काम आटपून घरी जाताना ही दुर्दैवी घटना घडली.

Podar School 2025

संजय गोयनका हे गणेशपूर रोडवरील मंगलम पार्क परिसरातील रहिवासी होते. ते लालपुलिया परिसरातील एका कोळसा प्लॉटवर काम करायचे. रात्री 11 वाजताच्या सुमारास ते काम आटपून मुकुटबन रोडवरून आपल्या दुचाकीने घरी जात होते. यावेळी विरुद्ध दिशेने येणारा ट्रकने (MH 29 BE 6155) त्यांच्या दुचाकीला धडक दिली. या धडकेत संजय चिरडले गेले व त्यांचा जागीच मृत्यू झाला.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

परिसरातील लोकांनी वणी पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली व संजयला वणीच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत केले. अतिशय मनमिळावू व्यक्तिमत्त्व म्हणून परिचित असेलेल्या संजयच्या अपघाती मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. सदर घटनेचा तपास वणी पोलीस करीत आहे.

हे देखील वाचा:

Comments are closed.