दोन ट्रकची समोरासमोर धडक, चालक ठार

जितेंद्र कोठारी, वणी : कोळसा वाहतूक करणारे दोन ट्रक एकमेकांवर धडकून भीषण अपघात घडला. रस्त्यावरील खड्डे चुकविण्याच्या प्रयत्नात समोरासमोर झालेल्या या अपघातात एका ट्रकचा चालक ठार झाला, तर दुसऱ्या ट्रकचा चालक जखमी झाला. शनिवार 13 मे रोजी रात्री 7.30 वाजता दरम्यान वणी-निळापूर मार्गावर संभवनाथ ऑईल मिल जवळ ही घटना घडली.

Podar School 2025

प्राप्त माहितीनुसार केएसटीसी ट्रान्सपोर्ट कंपनीचा ट्रक क्रमांक MH34 BZ 1609 हा कोल वॉशरीमधून कोळसा खाली करून येत होता. तर एसव्हीटी ट्रान्सपोर्ट कंपनीचा MH34 AV 0830 नंबरचा ट्रक कोळसा भरण्याकरिता कोल वॉशरीमध्ये जात होता. दरम्यान निळापूर गावाजवळ रस्त्यावरील खड्डे चुकविताना दोन्ही ट्रक समोरासमोर भिडले. या अपघातात एसव्हीटी ट्रान्सपोर्ट कंपनीचा ट्रकचालक संतोष किसन थाटे (40) रा. तेलीफैल, वणी हा गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आला. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. अपघातात केएसटीसी ट्रान्सपोर्ट कंपनीचा ट्रकचालक किरकोळ जखमी झाला. पुढील तपास वणी पोलिस करीत आहे. 

Comments are closed.