लालगुडा चौपाटीजवळ अपघात, तरुणाचा जागीच मृत्यू

रस्ता क्रॉस करताना भरधाव अज्ञात वाहनाची घडक

निकेश जिलठे, वणी: एका भरधाव अज्ञात वाहनाने एका तरुणाला चिरडले. यात एका इसमाचा जागीच मृत्यू झाला. शनिवारी संध्याकाळी 7.30 वाजताच्या सुमारास लालगुडा चौपाटी येथे ही घटना घडली. मंगेश ऋषीकेश बोरीकर (अंदाजे 37) असे मृतकाचे नाव आहे. हा अपघात इतका भीषण होता की यात मृतदेहाचा चेंदामेंदा झाला

मंगेश हा नवीन लालगुडा येथील रहिवासी होता. तो एमआयडीसी परिसरातील एका कंपनीत काम करतो. शनिवारी दिनांक 13 जानेवारी रोजी तो कामासाठी एमआयडीसीत गेला होता. संध्याकाळी ड्युटी संपल्यानंतर तो पायदळ घरी परतत होता. 7.30 वाजताच्या सुमारास लालगुडा चौपाटीजवळ तो रस्ता ओलांडत होता. दरम्यान एका भरधाव वाहनाने मंगेशला धडक दिली. यात वाहनाचे चाक अंगावरुन गेले. यात तो गंभीर जखमी झाला.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

अपघात होताच घटनास्थळी लोका गोळा झाले. तर वाहनचालक वाहन घेऊन फरार झाला. घटनेची तात्काळ माहिती वणी पोलिसांना देण्यात आली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनेचा पंचनामा केला व मृतदेह उत्तरिय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवला. मंगेशच्या दुर्दैवी मृत्यूमुळे गावात शोककळा पसरली आहे. अज्ञात वाहनाचा पोलीस शोध घेत आहे.

हे देखील वाचा: 

Comments are closed.