पेटूर येथे रस्ता क्रॉस करणा-या शेतक-याला मिनी बसची धडक

संतप्त गावक-यांचा मृतदेह घेण्यास नकार

0

जितेंद्र कोठारी, वणी: तालुक्यातील मुकुटबन रोडवरील पेटूर येथे एका शेतक-याला मिनी बसने जोरदार धडक दिली. जखमी झालेल्या शेतक-याला उपचारासाठी वणीतील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र आज उपचारादरम्यान शेतक-याचा मृत्यू झाला. देवराव दत्तूजी बोढाले (55) असे मृत शेतक-याचे नाव आहे. ही धडक इतकी गंभीर होती की यात शेतक-यासह असलेल्या बैलाचाही मृत्यू झाला आहे. 

Podar School 2025

देवराव बोढाले हे पेटूर येथील रहिवाशी होते. ते नेहमीप्रमाणे शेतीच्या कामासाठी शेतात गेले होते. मंगळवारी दिनांक 24 ऑगस्ट रोजी संध्याकाळी शेतातून गुरांना घेऊन ते घरी परतत होते. संध्याकाळीच मुकुटबन हून एक मिनीबस (MH34 AB8286) सिमेंट कंपनीतील कर्मचा-यांना घेऊन वणीला परत येत होती. दरम्यान 7.30 वाजताच्या सुमारास पेटूर येथील मेन रोडवर देवराव बोढाले हे बैलासह रस्ता क्रॉस करत होते. त्याच वेळी मिनीबसने त्यांना जोरदार धडक दिली. या अपघातात ते गंभीर जखमी झाले. तर बैलाचा मृत्यू झाला.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

देवराव यांना गावातील लोकांनी उपचारासाठी वणीतील ग्रामीण रुग्णालयात आणले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूची माहिती गावात मिळतात गावातील नागरिकांनी ग्रामीण रुग्णालयात धाव घेतली. जो पर्यंत नुकसान भरपाई मिळत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली. 

या प्रकरणी मिनी बसचा चालक सादिकुजमा शेख समशेर जमा शेख (44) रा. सर्वोदय कॉलोनी गडचिरोली, ह.मु. हनुमान वार्ड शिंदोला याला अटक केली असून त्यांच्यावर भादंविच्या कलम 279, 304(अ) व सहकलम मोटार वाहन कायदा 134 (A) (B) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्राप्त माहितीनुसार मिनीबसचा मालक हा चंद्रपूर येथील असून त्याने गावक-यांची भेट घेण्यास टाळाटाळ केल्याने गावकरी आक्रमक झाले होते.

हे देखील वाचा:

 

Leave A Reply

Your email address will not be published.