अपघात: पिकअपची ऑटोला धडक, एक जखमी

राजुर फाटा येथील घटना

जितेंद्र कोठारी, वणी: भरधाव मालवाहू वाहनाने प्रवासी ऑटोला धडक दिल्यामुळे ऑटोतील एक प्रवासी जखमी झाल्याची घटना राजुर फाटाजवळ बुधवारी सकाळी 11 वाजता दरम्यान घडली. ऑटोचलकाच्या फिर्यादवरुन वणी पोलिसानी पिकअप चलकविरुद्द गुन्हा दाखल केला आहे.

प्राप्त माहितीनुसार फिर्यादी ऑटो चालक विक्की गौतम जमले (33) रा. राजुर (कॉलरी) हा आपल्या ऑटोमध्ये 3 प्रवासी घेऊन राजुर येथून वणीकडे येत होता. दरम्यान राजुर फाटा जवळ यवतमाळ मार्गे येणाऱ्या मालवाहू पिकअप वाहन क्रमांक (MH26BE4492) च्या चालकाने निष्काळजीपणे भरधाव वाहन चालवून ऑटोला मागून धडक दिली.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

त्यात ऑटो पलटी होऊन ऑटोमध्ये बसलेला स्वप्नील मडावी रा. राजुर हा प्रवासी जखमी झाला, तसेच ऑटोचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. फिर्यादीच्या तक्रारीवरून पिकअप वाहन चलकविरुद्द भादवी कलम 279,337 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आले आहे. पुढील तपास सहा. उपनिरीक्षक कांबळे करीत आहे.

हे देखील वाचा:

Comments are closed.