अडेगाव परिसरात दारूची राजराेसपणे विक्री

विविध चर्चांना आले उधाण

0

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील अडेगाव येथे राजरोजसपणे दारू विक्री सुरू आहे. गावातील काही युवक हा व्यवसाय करीत असून, पोलीस प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत आहे. बसस्टँड, पाण्याच्या टाकीजवळ, तलावाजवळ, पानटपरी, चिकनच्या दुकानात व सबस्टेशनजवळ खुलेआम दारूची विक्री सुरू आहे. ज्यामुळे अल्पवयीन मुलांपासून तर वयोवृद्धांपयंर्त व्यसनाधीन झाले आहे. सदर दारूविक्रेते मुकुटबन येथील देशी दारू दुकानातून एक पेटी,अर्धी पेटी तर कुणी १५ ते २० बाटल्या घेऊन हा व्यवसाय करीत असल्याचे कळले.

निर्धारित किमतीपेक्षा जास्त दरात दारूची विक्री करीत असून, मद्यपिंची लूट करीत आहे. दारूविक्रेते मुकुटबन येथून दारू घेऊन जाण्याकरिता चिरीमिरी पोलिसांना देत असल्याचे बोलले जात आहे. पैसे न दिल्यास भट्टीवर वॉच ठेवून असलेले पोलीस कर्मचारी केस करण्याची धमकी देत असल्याची चर्चा आहे. पोलीस स्टेशनकडून अडेगावला कोणतीही दारू विक्रीची परवानगी नाही.

मात्र ठाणेदारांना अंधारात ठेवून काही पोलीस कर्मचारी वसुली करीत असल्याचे दिसून येते. तसेच दारू तस्करीत काही पोलीस कर्मचाऱ्यांचा सहभाग असल्याची चर्चा आहे. ठाणेदारांनी या भागातील दारू विक्रेत्यांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे..

Leave A Reply

Your email address will not be published.