आज सेवानिवृत्त अविनाश कोठाळे यांचा सन्मान सोहळा

शेगावनाका अमरावती स्थित अभियंता भवनात शनिवार २१ सप्टेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता कार्यक्रम

0

बहुगुणी डेस्क, अमरावती: पाटबंधारे विभागातून सहायक अधीक्षक अभियंता पदावरून इंजि. अविनाश कोठाळे नुकतेच निवृत्त झालेत. अनेक सामाजिक कार्यांमधेदेखील त्यांचा सिंहाचा वाटा आहे. सेवानिवृत्ती आणि सामाजिक कारकीर्दीनिमित्त त्यांचा सन्मान सोहळा त्यांच्या मित्रपरिवाराने आयोजित केला आहे.

स्थानिक शेगावनाका स्थित अभियंताभवनात शनिवार २१ सप्टेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता हा सोहळा होईल. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. गणेश पाटील हे सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी राहतील. कृषिमंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री ना. डॉ. अनिल बोंडे या सोहळ्याचं उद्घाटन करतील.

महाराष्ट्र राज्य गृहराज्यमंत्री (शहरे) मा. रणजित पाटील, आमदार तथा विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष, मा. डॉ. सुनील देशमुख, माजी राज्यमंत्री, सार्वजनिक बांधकाम तथा आमदार ना. प्रवीण पोटे पाटील, माजी खासदार मा. अनंत गुढे, अचलपूर विधानसभा क्षेत्राचे आमदार मा. बच्चूभाऊ उपाख्य ओमप्रकाश कडू, श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे कोषाध्यक्ष मा. दिलीपबाबू इंगोले, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस मा. संजय खोडके, डॉ. पंजाबराव देशमुख अर्बन को. ऑप. बँक, अमरावतीचे अध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष मा. राजेंद्र महल्ले, भारतीय जनता पार्टी (अमरावती ग्रामीण)चे अध्यक्ष मा. दिनेश सूर्यवंशी, महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण, मुंबईचे सचिव मा. रसिक चौहान उपस्थित राहतील.

अविनाश कोठाळे यांची अभियंता म्हणून यशस्वी कारकीर्द राहिली. त्यांनी आपल्या कर्तव्यावर असताना अनेक लोकोपयोगी कामं केलीत. जिजाऊ कमर्शियल बँकेचे संस्थापक अध्यक्ष म्हणून त्यांनी अनेकांना रोजगार उपलब्ध करून दिला. त्यांच्या आतापर्यंतच्या जीवनकार्यावर तयार केलेला माहितीपट यावेळी दाखविण्यात येईल. या माहितीपटाची संकल्पना ईश्वर वैद्य यांची असून संहिता आणि निवेदन सुनील इंदुवामन ठाकरे यांनी केलं आहे.

चित्रण आणि संकलन उमेश राऊत आणि नागसेन यांनी केलं. याच दरम्यान त्यांना मानपत्र प्रदान करण्यात येईल. राजेंद्र जाधव, मंजूषा जाधव आणि मित्रपरिवार त्यांना भेटवस्तू देऊन सत्कार करतील.

आयोजन समितीचे प्रमुख मा. ईश्वरदास वैद्य, इंजि. राजेंद्र जाधव, मा. मोहन इंगळे, मा. दिलीप राऊत, मा. विद्याधर इंगोले, मा. किशोर भांबूरकर, मा. शीतल राऊत, मा. हरीश देशमुख, मा. कमल मालवीय, मा. पुरुषोत्तम जवंजाळ आणि मा. सतीश राऊत यांनी या सोहळ्याला उपस्थित राहण्याची विनंती केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.