वणीतील मोबाईल शॉपीवर प्रशासनाच्या पथकाची धाड

दंड देण्यास नकार, संचालकावर गुन्हा दाखल

0

जितेंद्र कोठारी, वणी: कोरोना संसर्ग संबंधी शासनाने लागू केलेले नियमांचे उल्लंघन करून उघडी असलेल्या मोबाईल दुकानावर पालिका पथकाने कारवाई करून दुकान सील केली आहे. दंडाची रक्कम भरण्यास नकार दिल्यामुळे दुकान संचालकावर गुन्हा दाखल करण्यात आले.

शहरातील खाती चौकातील एक मोबाईल शॉपी सुरु असल्याची माहिती वरून नगर पालिका पथकाने गुरुवार 20 मे रोजी सील ठोकले. तसेच दंड भरण्यास नकार दिल्याने संचालकाविरोधात वणी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

प्राप्त माहितीनुसार प्रशासनाने जिल्ह्यात १५ मे पर्यंत कठोर निर्बंध लागू करीत अत्यावश्यक सेवांची दुकाने वगळता अन्य सर्व दुकानं बंद करण्याचे आदेश दिले आहे. मात्र शहरातील अनेक दुकानदार छुप्या पद्दतीने शटर बंद करुन ग्राहकांना माल विक्री करीत आहे.

दुकानात ग्राहकांना बसवून तसेच बाहेरून शटर बंद करुन व्यवसाय करीत असल्याचा माहितीवरून पालिका प्रशासनाने यापूर्वी माहेर कापड केंद्र, राधिका साडी सेंटर, विश्वामित्र बार अँड रेस्टॉरंट तसेच दोन भंगार व्यवसायिकविरुद्द कारवाई करून दंडात्मक कारवाई केली.

दंडाची रक्कम भरण्यास नकार देणाऱ्या आस्थापनेविरुद्द वणी पो.स्टे. मध्ये आपत्ती व्यवस्थापन कलम 188 व 269 अनव्ये गुन्हा दाखल करण्यात आले आहे. सदर कारवाई प्रभारी तहसीलदार विवेक पांडे, प्रभारी मुख्याधिकारी रवींद्र कापशीकर व पोलीस पथकाने केली.

हे देखील वाचा:

आज तालुक्यात 63 रुग्ण तर 118 रुग्णांची कोरोनावर मात

छातीत सुरा भोकसून मुलाने केली पित्याची हत्या

Leave A Reply

Your email address will not be published.