आणखी एकाची विष प्राशन करून आत्महत्या

मारेगाव तालुक्याला लागले आत्महत्यांचे ग्रहण

0

नागेश रायपुरे,मारेगाव: तालुक्यात सतत घडत असलेल्या आत्महत्यांच्या घटनांमुळे जणू काही तालुक्याला आत्महत्यांचे ग्रहण लागल्याचे अनुभवास मिळत आहे. अशातच तालुक्यातील पहापळ येथील एका 45 वर्षीय इसमाने राहत्या घरी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. सोमवारी 23 नोव्हेंबर रोजी ही घटना घडली. अरुण भाऊराव माणुसमारे असे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे.

Podar School 2025

अरुण भाऊराव माणूसमारे (45) यांच्याकडे साडे तीन एकर शेती होती. पिसगाव सहकारी सोसायटीचे अंदाजे 70 हजाराचे कर्ज आणि इतर खाजगी कर्ज त्यांच्यावर होते. त्यांनी आर्थिक विवंचनेत आत्महत्या केली असावी, असा नातेवाईकांचा अंदाज आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

कुटुंबीयांच्या ही बाब लक्षात येताच त्यांना उपचारार्थ मारेगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्याच्यामागे पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा आप्त परिवार आहे. याबाबत पुढील तपास मारेगाव पोलीस करीत आहे.

हेदेखील वाचा

हेदेखील वाचा

Leave A Reply

Your email address will not be published.