बेवडाच बेवडा; पण पराक्रमी हा केवढा!

काम देणाऱ्यालाच फावड्याच्या दांड्यानं केले जखमी

बहुगुणी डेस्क, वणी: बेवडे कधी काय करतील, याचा काहीच भरवसा देता येत नाही. आपल्याला मदत करणाऱ्यालाही नुकसान पोहचवण्यास ते मागंपुढं पाहत नाहीत. कधी कुणाच्या अंगावर धावून जातील तेही सांगता येत नाही. नजिकच्या पळसोनी येथे शुक्रवार दिनांक 16 मे रोजी जो प्रसंग घडला, त्याचं कोडं उलगडता उलगडेना. रोजगार देणाऱ्यालाच एका बेवड्यानं रक्तबंबाळ होईपर्यंत फावड्याच्या दांड्यानं मारहाण केली. जखमी इसम वणीवरून औषधोपचार करून परतले. येताना परत त्याच आरोपीनं त्या इसमाच्या सोबत्यालाही गावाजवळ मारहाण केली. त्यामुळे या प्रकरणाची चर्चा चांगलीच रंगत आहे.तक्रारीनुसार पळसोनी येथील फिर्यादी पुरुषोत्तम बंडु झट्टे (26) यांच्याकडे दोन पिकअप गाड्या आहेत. त्यातली एक गाडी ते स्वत: भाड्यावर चालवतात. गावात आशीष रामा नावडे (23) हा युवक राहतो. तो नेहमीच दादागिरी करत असतो. विनाकारण कोणालाही शिवीगाळ करून मारण्याची धमकी देत असतो. त्याच युवकाला पुरुषोत्तम बंडु झट्टे यांनी काम दिली. त्यांनी घराच्या बांधकामाची आधीच घेऊन ठेवलेली रेती गावाच्या बाहेर खुल्या जागेत टाकली होती. ती रेती खाली पसरत होती. म्हणून त्यांनी गावातीलच आशीष नावडेला रेती एका जागी जमाकरण्यासाठी रोजंदारीनं येण्यास सांगितलं. आरोपीनंसु‌द्धा रेती एकत्र जमा करून देतो, असंसु‌द्धा म्हटलं.

ठरल्यानुसार शुक्रवार दिनांक 16 मे रोजी रात्री 8.30 वाजताच्या सुमारास घरीच होते. तेव्हा आरोपी आशीष रामा नावडे आला. रेती जमा करून दे, मी तुला पैसे देतो असं फिर्यादीनं म्हटलं. अचानक आरोपीची भावमु्द्रा बदलली. त्यानं रेती जमा करायला नकार दिला. झट्टे यांनी ते काही मनावर घेतलं नाही. मात्र एकाएकी आरोपी शिवीगाळ करायला लागला. फिर्यादीनं शिवीगाळ करू नको असं त्याला म्हटलं. तेवढ्यातच आशीषनं हातात असलेल्या फावड्‌याच्या लाकडी दांडा पुरुषोत्तम बंडु झट्टेंच्या डोक्याच्या मागील बाजूस मारला. त्यामुळे ते रक्तबंबाळ झालेत. जाताना आशीषनं एखाद्या दिवशी पुन्हा मारतो, अशी धमकीही दिली. त्यानंतर झट्टे आपल्या मित्रासोबत वणीला दवाखान्यात उपचारासाठी गेलेत. तिथून परतत असताना पळसोनी जवळील पुलाजवळ आशीष रामा नावडेनं त्यांना पुन्हा गाठलं. यावेळी आशीष रामा नावडे दारूच्या नशेत तर्र होता. त्यानं पुन्हा शिवीगाळ केली. पुलाजवळच पुरुषोत्तम झट्टे व त्यांच्या मित्रास लाथाबुक्क्यांनी मारहाणही केली. त्यानंतर मात्र पुरुषोत्तम बंडु झट्टे यांनी पोलीस स्टेशनच गाठलं. तकारीवरून सदरचा गुन्हा नोंद झाला. पुढील तपास पोलीस करत आहेत.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.