का जगण्याला कंटाळलेत युवक? पुन्हा दुसरी आत्महत्या….

ऐन तारुण्याच्या भरात, जळक्याच्या युवकानंही सोडलं जग

बहुगुणी डेस्क, वणी: मारेगाव तालुक्यातील वेगाव इथल्या युवकानं गळफास लावून आत्महत्या केली. या बातमीची शाई वाळते न वाळते तोच जळकापोड इथल्या युवकानं शनिवार दिनांक 17मे रोजी तशीच रोहिणीच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. एकापाठोपाठ झालेल्या या घटनांनी संपूर्ण मारेगाव तालुक्याला हादरा बसला. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या जळकापोड येथील प्रीतम हुसेन आत्राम (23) या शिक्षित व होतकरू युवकानं जगाचा निरोप घेतला. एन उमेदीच्या वयात युवक जगण्याला का कंटळत आहेत? हा प्रश्न आ वासून उभाच आहे.

शनिवार दिनांक 17 मे रोजी दुपारच्या सुमारास प्रीतम घराबाहेर पडला. संध्याकाळ होत आली तरी तो घरी परतला नव्हता. उशिरा येण्याचा कोणता निरोपही त्याने घरी दिला नव्हता. त्याची विचारपूस सुरू झाली. सर्वत्र शोध घेणं सुरू झालं. अखेर नको ते आणि अनपेक्षित दृश्य समोर आलं. सायंकाळी 5 वाजता स्वतःच्याच शेतात रोहिणीच्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत त्याचा मृतदेह आढळला. घटनेबाबत पोलीस पाटील यांनी मारेगाव पोलिसांना कळविले. त्यानंतर पोलिसांनी पंचनामा करुन मृतदेह मारेगाव ग्रामीण रुग्णालयात पाठविले.

प्राप्त माहितीनुसार प्रीतम आत्राम स्पर्धा परीक्षांची तयारी करत होता. घरीची गरिबी बघता तो शेतकरी वडिलांनाही हातभार लावत होता. प्रज्ञावंत, नम्र, सुस्वभावी अशी प्रीतमची त्याच्या गोतावळ्यात ओळख होती. तो विविध स्पर्धा परीक्षा देतच होता. अत्यंत गुणी अशा युवकानं आत्महत्या का केली याचं कारण स्पष्ट झालं नाही. तरीही त्याचे आईवडील, भाऊ, मित्र व जवळच्यांसाठी तो मोठा धक्काच आहे. असून प्रीतम यांनी काय कारणाने आत्महत्या केली याबाबत स्पष्ट झाले नाही. घटनेचा पुढील तपास सहा. पो. निरीक्षक संजय सोळंके यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार दिगांबर किनाके करीत आहेत. सलग झालेल्या दोन युवकांच्या आत्महत्यांनी मारेगाव तालुका अजूनही मानसिक धक्क्यातून सावरला नाही.

हेदेखील वाचा…

मरणाने केली सुटका, जगण्याने छळले होते…. 

 

हेदेखील वाचा…

आत्महत्या हा पहिला किंवा शेवटचाही मार्ग नाही…

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.