पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात शिवसेनेचे धरणे आंदोलन

जोरदार घोषणाबाजी करत केला दरवाढीचा निषेध

0

जब्बार चीनी, वणी: पेट्रोल डिझेलच्या सततच्या दरवाढी विरोधात वणीत आज शुक्रवारी दिनांक 05 फेब्रुवारी रोजी शिवेसेनेने मोर्चा काढून धरणे आंदोलन केले. स्थानिक टिळक चौकात सुमारे एक तास हे आंदोलन चालले. यावेळी मोदी सरकार हाय हाय, पेट्रोल दरवाढ मागे घ्या, पेट्रोल डिजेलची दरवाढ करणा-या सरकारचा धिक्कार असो अशी जोरदार घोषणाबाजी करण्यात याली. शिवसेनेचे जिल्हा प्रमुख विश्वास नांदेकर यांच्या मार्गदर्शनात हे आंदोलन करण्यात आले.

गेल्या काही दिवसांपासून सतत पेट्रोल व डिझेलच्या दरात वाढ होत आहे. त्यामुळे महागाई देखील वाढत आहे. त्याचा सर्वसामान्य लोकांना मोठ्या आर्थिक फटका बसत आहे. त्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यव्यापी आंदोलन करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार वणीत आज आंदोलन करण्यात आले.

सुमारे 12 वाजता रेस्ट हाऊस जवळून शिवसैनिकांनी मोर्चा काढत या आंदोलनाला सुरुवात केली. पेट्रोल, डिझेल दरवाढ विरोधात जोरदार घोषणाबाजी करत हा मोर्चा शिवतीर्थ येथे पोहेचला. तिथे सर्व शिवसैनिकांनी धरणे आंदोलन सुरू केले. सुमारे 1 तास हे धरणे आंदोलन चालले. यावेळी मोदी सरकार हाय हाय, पेट्रोल दरवाढ मागे घ्या, पेट्रोल डिजेलची दरवाढ करणा-या सरकारचा धिक्कार असो अशी जोरदार घोषणाबाजी करण्यात याली.

सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सेना रस्तावर – विश्वास नांदेकर
पेट्रोल, डिझेलच्या किमती वाढल्याने वाहतुकीचा खर्च वाढला. परिणामी देशात महागाई वाढत आहे. आधीच कोरोनामुळे सर्वसामान्यांची आर्थिक परिस्थिती बिघडली असताना त्यातच सततच्या पेट्रोलच्या दरवाढीमुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. त्यामुळे सर्वसामान्यांनाा न्याय मिळवून देण्यासाठी शिवसेना रस्त्यावर उतरली आहे.
– विश्वास नांदेकर, जिल्हा प्रमुख शिवसेना

या आंदोलनात संजय देरकर, संजय निखाडे, दीपक कोकास, शरद ठाकरे, रवी बोढेकर, चंद्रकांत घुगुल, संजय आवारी, गणपत लेडांगे, राजू तुराणकर, विक्रांत चचडा, योगिता मोहोड, गीता उपरे, प्रणिता घुगुल, सविता आवारी, संतोष माहुरे, अजय नागपुरे, प्रशांत बलकी, विनोद उपरवार, महेश चौधरी, अनुप चटप, सौरभ खडसे, सतिश व-हाटे, कुंदन टोंगे, जीवन डवरे, संभा मत्ते, अभय चौधरी, अजिंक्य शेंडे, ललित लांजेवार, मंगल भोंगळे, जनार्दन थेटे, राजू वाघमारे, मधू वराटकर, हनी बतरा यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.

हे देखील वाचा:

वणीत शनिवारी सर्वपक्षीय चक्काजाम आंदोलन

शेतकरी आंदोलनाच्या समर्थनात शनिवारी मारेगावात चक्काचाम आंदोलन

Leave A Reply

Your email address will not be published.