सुशील ओझा, झरी: मुकुटबन येथून 4 किमी अंतरावर असलेल्या गणेशपूर येथील 11 वर्षीय चिमूकल्याचा कुलरचा शॉक लागून मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी दिनांक 6 ऑगस्ट रोजी घडली. दिव्यांशू सुरेश बांधूरकर असे मृत चिमुकल्याचे नाव आहे.
गणेशपूर येथे सुरेश बांधूरकर राहतात. ते एका दुकाना काम करतात. तर त्यांच्या पत्नी या शेतात काम करतात. शुक्रवारी ते दोघेही नेहमीप्रमाणे कामानिमित्त घराबाहेर गेले होते. दरम्यान त्यांचा मुलगा दिव्यांशू (11) हा शाळेत गेला होता.दुपारी शाळेतून घरी जेवण करण्याकरिता आला. गरमी होत असल्याने त्यांने जेवणापूर्वी कुलर सुरू केला. मात्र कुलरमध्ये विद्युत करंट होता. त्याचा शॉक लागून दिव्यांशूचा मृत्यू झाला. त्यानंतर तो घरात एकटाच पडलेल्या अवस्थेत होता.
काही वेळानंतर दिव्यांशूची मोठी बहीण शाळेतून घरी आली. तेव्हा तिला दिव्यांशू हा जमिनीवर पडलेला दिसला. तिने भावाला उठवण्याचा प्रयत्न केला असता तो हालचाल करत नव्हता. मात्र त्यामुळे तिने घाबरून ही माहिती आपल्या वडीलांना दिली.
सर्वांनी घराकडे धाव घेतली. दिव्यांशूला त्याच्या कुटुंबीयांनी वणी येथील रुग्णालयात नेले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. याबाबत वणी पोलीस स्टेशनला नोंद करण्यात आली. कुलरमध्ये करंट कसा आला हे अद्याप स्पष्ट झाले नाही. दिव्यांशुच्या मृत्यूमुळे संपूर्ण गावात हळहळ व्यक्त होत आहे.
हे देखील वाचा:
उपोषण मंडपात आमदार व काँग्रेस तालुका अध्यक्षांमध्ये शाब्दिक खडाजंगी